
पुणे शहर परिसरात गेल्या आठवड्यात थैमान घातल्यानंतर पावसाने आता विश्रांती घेतली. यामुळे येत्या दिवसांत थंडी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
पुणे - शहर परिसरात गेल्या आठवड्यात थैमान घातल्यानंतर पावसाने आता विश्रांती घेतली. यामुळे येत्या दिवसांत थंडी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शहरात जानेवारीमध्ये गेल्या ७३ वर्षांमध्ये कधीही झाला नव्हता, इतका पाऊस २०२१च्या सुरुवातीचा कोसळला. या काळात हवेतील आद्रतेचे प्रमाण ९६ टक्के होते. गेल्या चोवीस तासांमध्ये पावसाची नोंद झाली नाही. गेल्या १ जानेवारीपासून पुण्यात ३६.८ मिलिमीटर, लोहगाव येथे २९.६ आणि पाषाण येथे २९.४ मिलिमीटर पाऊस पडला. या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्याच्या हवामान अंदाजाकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
पुण्यात 'I Love Narhe' पॉईंटजवळ भूमकर पुलावर भीषण अपघातात 2 ठार तर 3 जखमी
पुणे शहर आणि परिसरात येत्या सोमवारी (ता. ११) आकाश निरभ्र राहणार आहे. त्यानंतर पुढील चार ते पाच दिवस हवामान कोरडे राहणार आहे. त्यामुळे शहरात थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमान सरासरीपेक्षा ८.८ ने वाढून १९.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
चष्म्याचा नंबर घालवायचा आहे; तर मग हे वाचाच
राज्यातही थंडी परतणार
गेल्या आठवड्यात राज्यात ठिकठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. राज्यात सोमवारपासून (ता. ११) हवामान कोरडे राहणार आहे. अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात काही प्रमाणात चक्रीय वाऱ्यांची स्थिती असली, तरी त्याचा फारसा प्रभाव नाही. त्यामुळे राज्यात सहा ते सात दिवस असलेली ढगाळ वातावरणाची स्थिती निवळून गेली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
Edited By - Prashant Patil