चष्म्याचा नंबर घालवायचा आहे; तर मग हे वाचाच

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

चष्म्याचा नंबर घालविण्याची शस्त्रक्रियेसाठी पूर्वी ‘पीआरके’ नावाची पद्धत वापरली जायची. या प्रकारची शस्त्रक्रिया पंधरा वर्षांपूर्वी एका नेत्ररुग्णालयात तरुणावर करण्यात आली. परंतु, जेमतेम सहा महिन्यांमध्ये या तरुणाला पुन्हा चष्मा लागला. त्याचा चष्म्याचा नंबर ६ ते ७ होता. या तरुणाला काही करून चष्मा नकोच होता.

पुणे - चष्म्याचा नंबर घालविण्याची शस्त्रक्रियेसाठी पूर्वी ‘पीआरके’ नावाची पद्धत वापरली जायची. या प्रकारची शस्त्रक्रिया पंधरा वर्षांपूर्वी एका नेत्ररुग्णालयात तरुणावर करण्यात आली. परंतु, जेमतेम सहा महिन्यांमध्ये या तरुणाला पुन्हा चष्मा लागला. त्याचा चष्म्याचा नंबर ६ ते ७ होता. या तरुणाला काही करून चष्मा नकोच होता. त्यामुळे त्याने दुसरी शस्त्रक्रिया केली. ती शस्त्रक्रिया केली अत्याधुनिक ‘स्माइल’ पद्धतीने! 

बांधकाम क्षेत्रातील उलाढाल आली रुळावर

‘एशियन आय हॉस्पिटल’मध्ये रुग्णावर ‘स्माइल’ या पद्धतीने शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या चष्म्याचा नंबर परत घालवला. त्याला वैद्यकीय परिभाषेत ‘एनहान्समेंट’ म्हणतात. ‘पीआरके’ शस्त्रक्रिया केल्यानंतरही परत आलेला चष्म्याचा नंबर घालविण्याची जगातील पहिली शस्त्रक्रिया पुण्यातील ‘एशियन आय हॉस्पिटल’चे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. वर्धमान कांकरिया यांनी केली. दुर्मिळ आणि आव्हानात्मक शस्त्रक्रियेचा शोधनिबंध नेत्ररोगातील प्रख्यात नियतकालिक असलेल्या ‘इंडियन जर्नल ऑफ ऑफथॅलमॉलॉजी’ने (आयजोओ) स्वीकारला आहे. तो ऑनलाइन प्रसिद्ध झाला असून, लवकरच त्याच्या मुद्रित अंकांतही वाचता येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत डॉ. कांकरिया म्हणाले, ‘‘चष्म्याचा नंबर कमी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आतापर्यंत विकसित झाल्या आहेत. त्यात ‘सरफेस ॲब्लेशन’ ही एक होती. त्यात चष्म्याचा नंबर पुन्हा येण्याची शक्‍यता अधिक असे. त्यानंतर ‘लॅसिक’ ही शस्त्रक्रिया पद्धत पुढे आली. पाठोपाठ ‘ब्लेडलेस लॅसिक’ ही शस्त्रक्रिया पद्धत आली. त्यानंतर आत ‘स्माइल’ ही शस्त्रक्रिया पद्धत आली. स्माइल या पद्धतीत बुब्बुळाचा पापुद्रा बाजूला न करता त्याची वक्रता बदलून चष्म्याचा नंबर कमी करणे शक्‍य असते. त्यासाठी एकाच फेम्टो लेसरचा वापर केला जातो.’

पुण्यात 'I Love Narhe' पॉईंटजवळ भूमकर पुलावर भीषण अपघातात 2 ठार तर 3 जखमी

अशा प्रकारच्या प्रसिद्ध नियतलिकांमध्ये शोधनिबंध प्रसिद्ध होण्यासाठी चष्म्याचा दीर्घकाळपर्यंत रुग्णाला परत चष्म्याचा नंबर आलेला नाही, ही सिद्ध करावे लागले. एक महिन्यापूर्वी केलेल्या शस्त्रक्रियेतून चष्म्याचा नंबर गेला, असे दाखवता येत नाही. अशा केसेसमध्ये रुग्णाचा किमान पाच वर्षांचा पाठपुरावा लागतो. त्यामुळे या रुग्णावर २०१५ मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पाच वर्षांच्या पाठपुराव्यानंतर असे स्पष्ट दिसते की, ‘स्माइल’ या पद्धतीने केलेल्या शस्त्रक्रियेमुळे चष्म्याचा नंबर यशस्वीपणे घालविता येतो.

पालकांनो, शाळा-कनिष्ठ महाविद्यालयाकडून तुमची दिशाभूल होतेय का? मग ही बातमी वाचाच

अत्यंत सूक्ष्म छेदातून दुर्बिणीच्या साहाय्याने केलेल्या शस्त्रक्रिया पद्धतीचे हे वरदान आहे. त्यामुळे यापूर्वी शस्त्रक्रिया करूनही चष्म्याच्या नंबर परत आलेल्या शस्त्रक्रिया पुन्हा करता येऊ शकतात, असा विश्‍वासही डॉ. कांकरिया यांनी व्यक्त केला.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: you want to spend the number of glasses then read this