Pune Crime:'कात्रजमध्ये पैशांच्या वादातून सहकाऱ्याचा खून'; आरोपीला अटक, पैशांचा वाद विकाेपाला पाेहचला अन्..
Katraj Murder Case: काही दिवसांपूर्वी पैशांच्या देवाणघेवाणीवरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी सद्दामने विक्रमला मारहाण केली होती. याच रागातून आरोपी विक्रमने सद्दामला बेदम मारहाण केली. त्यात सद्दामचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने मृतदेह घराच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत फेकून दिला.
पुणे : कात्रजमधील निंबाळकरवाडी परिसरात बेवारस अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खूनप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या काही तासांत एका आरोपीला अटक केली. हातऊसने दिलेल्या पैशांच्या वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.