esakal | कॅम्पस इंटरव्हू झाला, ऑफर लेटर मिळाल पण आता..
sakal

बोलून बातमी शोधा

colleges are taking efforts to maintain the student job offer

- "ऑफर लेटर' मिळालेले विद्यार्थी चिंतेत
- महाविद्यालये कंपन्यांशी साधणार संवाद

कॅम्पस इंटरव्हू झाला, ऑफर लेटर मिळाल पण आता..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे, : "महाविद्यालयात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये झालेल्या 'कॅम्पस इंटरव्हू'मध्ये तुमची निवड झालीयं, आणि काय, तुम्हाला 'ऑफर लेटर'ही मिळालेयं! परंतु आता लॉकडाऊनमुळे तुम्हाला मिळालेली नोकरी राहणार का?, असा प्रश्‍न पडलायं. अहो, मग चिंता नका करू. आपल्या महाविद्यालयांतील संबंधित समन्वयक नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांच्या संपर्कात आहेत आणि विद्यार्थ्यांना मिळालेली नोकरीची संधी लॉकडाऊननंतरही तशीच राहावी, यासाठी ते प्रयत्नात आहेत.

पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात वेध लागतात ते नोकरीचे. "कॅम्पस इंटरव्हू'च्या माध्यमातून हजारों विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्चमध्ये नोकरी मिळाल्याचे पत्र मिळते. त्यामुळे हे विद्यार्थी एरवी निवांत असतात. परंतु यंदा कोरोनाच्या प्रार्श्‍वभूमीवर सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना "ऑफर लेटर'प्रमाणे नोकरी आता राहणार का, अश चिंता सतावू लागली आहे.

शिक्षकानों वर्क फ्रॉम होम करताय! ऑनलाईन पध्दतीने होणार मुल्यमापन
याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर म्हणाले,"विद्यार्थ्यांचे "ऑफर लेटर' मागे घेण्यासंदर्भात कोणत्याही कंपन्यांनी अद्याप संपर्क साधलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निर्धास्त राहावे. लॉकडाऊनमुळे यापूर्वी झालेल्या "प्लेसमेंट'वर फारसा परिणाम होईल, असे वाटत नाही. परंतु विद्यार्थ्यांना दिलेल्या पॅकेजमध्ये आणि कामावर रूजू होण्याचा कालावधीत बदल होऊ शकतो.''

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
भारती अभिमत विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव म्हणाले,""महाविद्यालयातील 580 विद्यार्थ्यांपैकी जवळपास 465 विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्युमधून नोकरी मिळाली आहे. परंतु लॉकडाऊननंतरही "ऑफर लेटर'प्रमाणे विद्यार्थ्यांना नोकरीची संधी द्यावी, यासंदर्भात कंपन्यांशी संवाद साधत आहोत. "ऑफर लेटर'नुसार नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांना जुन-जुलैमध्ये कामावर रूज होण्यास सांगितले होते. परंतु आता हा कालावधी एक-दोन महिन्यांनी मागे-पुढे होऊ शकतो. यंदा जवळपास 120 कंपन्यां नोकरी देण्यासाठी महाविद्यालयात येणार होत्या. त्यापैकी 86 कंपन्या यापूर्वी येऊ गेल्या आहेत. उर्वरित 34 कंपन्यांनी लॉकडाऊननंतरही नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव कायम ठेवावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.''

मोठी बातमी : मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दारावर कोरोनाची धडक
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या उपसचिव डॉ. निवेदिता एकबोटे म्हणाल्या, "अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून नोकऱ्या मिळालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना ऑगस्टपासून कंपन्यांमध्ये रूजू होण्यास सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. त्याशिवाय संबंधित कंपन्यांशी लॉकडाऊननंतर पुन्हा संपर्क साधण्यात येणार आहे. मॉडर्न इनस्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमधील विद्यार्थी फेब्रुवारीमध्येच कंपन्यांमध्ये रूजू झाले आहेत. सध्या ते घरातून काम करत आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी लॉकडाऊननंतर प्रयत्न करणार आहोत.''

loading image