बुधवारपासून महाविद्यालये होणार सुरू

तब्बल १८ महिन्यांपासून बंद असलेली वरिष्ठ महाविद्यालये बुधवारपासून (ता. २०) खुली होणार.
college
collegesakal

पुणे - तब्बल १८ महिन्यांपासून बंद असलेली वरिष्ठ महाविद्यालये बुधवारपासून (ता. २०) खुली होणार आहेत. प्रदीर्घ काळानंतर महाविद्यालयातील प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून येते. महाविद्यालयांमधील अभ्यासक्रम टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याची तयारी सध्या केली असून त्याप्रमाणे महाविद्यालयांनी वेळापत्रक केले आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयात ऑफलाइन पद्धतीने नियमित वर्ग बुधवारपासून (ता.२०)  सुरू करण्याला राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही महाविद्यालये सुरू करण्याबाबत नुकतेच परिपत्रक काढले आहे. यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिलेल्या आदेशानुसार महाविद्यालये सुरू करण्याची कार्यवाही करावी. तसेच  तसेच नाशिक, नगर जिल्ह्यातील सर्व संलग्न महाविद्यालयांनी त्या जिल्ह्यातील प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांनी दिलेल्या आदेशानुसार महाविद्यालये सुरू करण्याबाबत कार्यवाही करावी, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

college
पैसे मागण्याच्या कारणावरुन मोठ्या भावाने केला लहान भावाचा खुन

वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये वर्ग खोल्या, महाविद्यालयाचा आवार, ग्रंथालय, प्रयोगशाळा, प्रशासकीय कार्यालये येथे निर्जंतुकीकरण करण्याचा कामाला वेग आला आहे. त्याशिवाय महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. बहुतांश महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून कोरोना प्रतिबंध लस घेतल्याबाबतची माहिती मागविली आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिलेल्या सूचना :

- कोरोना प्रतिबंध लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात मिळणार प्रवेश

- महाविद्यालयात असेल ५० टक्के उपस्थिती

- मास्कचा वापर अनिवार्य

- वर्गात प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची सोय महाविद्यालयांना उपलब्ध करून द्यावी लागणार

- विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आवाहन

टप्प्या-टप्प्याने महाविद्यालये सुरू करण्याची तयारी

‘‘विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंध लसीचे दोन डोस घेतले आहेत की नाही, हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून माहिती संकलित केली जात आहे. प्रत्यक्ष वर्गात ५० टक्केच विद्यार्थी हजर राहणार आहेत. वर्गात हजर असणारे विद्यार्थी शिकत असताना, उर्वरित विद्यार्थी ऑनलाइनद्वारे

शिकू शकणार आहेत. टप्प्या-टप्प्याने विविध अभ्यासक्रम सुरू करणार असून त्यादृष्टीने नियोजनबद्ध वेळापत्रक तयार केले आहे.’’

- डॉ. सीमा पुरोहित, प्राचार्य, बीएमसीसी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com