भोरमधील कंपनीने लपवली कोरोनाबाधित कामगाराची माहिती, प्रशासनाने उचलले हे पाऊल...

किरण भदे
सोमवार, 29 जून 2020

कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळुन आल्यानंतर कपंनी व्यवस्थापनाने कंपनी बंद ठेवून इतर कामगारांबद्दल काळजी घेत त्वरीत भोर तालुका प्रशासनास याबाबत माहिती देणे गरजेचे होते. मात्र, कंपनीने ही माहिती दिली नाही व कंपनी देखिल चालू ठेवली.

नसरापूर (पुणे) : भोर तालुक्यातील वरवे येथील एका खासगी कंपनीमध्ये 25 जुन रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने याबाबत तालुका प्रशासन व आरोग्य विभागाला माहिती दिली नाही. तसेच, कंपनी चालू ठेवल्याबद्दल कंपनी व्यवस्थापनावर भोरचे तहसीलदार अजित पाटील यांनी ताशेरे ओढले आहेत. 

शिरूर- हवेलीतील कुटुंबांना माहेरचा आधार

तहसीलदार पाटील यांच्यासह भोरचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीप कापशीकर, मंडलाधिकारी विद्या गायकवाड, तलाठी के. के. पाटील, ग्रामसेवक शिवरकर यांनी आज कंपनीमध्ये भेट देऊन संसर्गाच्या पार्श्वभमीवर कंपनी बंद करून संपर्कात आलेल्या कामगारांची माहिती घेतली. 
कंपनीमध्ये काम करणारा हडपसर येथे राहणाऱ्या कामगारास 25 जून रोजी कंपनीमध्ये काम करत असताना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तो कामावरून निघून हडपसर येथे घरी गेला. त्याने त्याच दिवशी हडपसर येथील नोबेल हाँस्पिटल येथे स्वॅब देऊन कोरोनाची तपासणी केली. दुसरया दिवशी त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आढळुन आला. त्यानंतर कपंनी व्यवस्थापनाने कंपनी बंद ठेवून इतर कामगारांबद्दल काळजी घेत त्वरीत भोर तालुका प्रशासनास याबाबत माहिती देणे गरजेचे होते. मात्र, कंपनीने ही माहीती दिली नाही व कंपनी देखिल चालू ठेवली. 

दिव्यांग विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण

या रुग्णाबाबत स्थानिक तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून भोर प्रशासनास माहिती आली. त्यानंतर या कंपनीची माहिती घेण्यात आली. रविवार कंपनी बंद असल्याने याबाबत अधिक माहीती प्रशासनास मिळू शकली नाही. मात्र, सोमवारी कंपनी चालू झाल्यावर याबाबत माहिती घेण्यात आली. कोरोना रुग्णाची माहिती लपवल्याबद्दल कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात येऊन कडक सूचना देण्यात आल्या. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या कंपनीमध्ये एकूण 154 कामगार असून, यामधील निम्मे कामगार वर्क फाॅर्म होम करत आहेत व निम्मे रोज कामावर येत आहेत. या मध्ये भोर तालुक्यातील अनेक कामगार आहेत. या कामगारांच्या संपर्कात आलेल्या भोर तालुक्यातील 56 कामगारांबरोबर एकूण 100 कामगारांना होम क्वारंटाइन करण्यात आले असून, 18 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले. त्यांचे अहवाल उद्या येणार आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The company in Bhor taluka hid the information of the coronated workers