पुण्यातल्या पर्वती मतदारसंघात बोगस मतदानाची तक्रार दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

पर्वती मतदारसंघातील शकुंतला शिंदे संकुल, बॅडमिंटन हॉल, बिबवेवाडी येथील मतदान केंद्रावर अज्ञात व्यक्तीने बोगस मतदान केल्याची तक्रार एका मतदाराने केली आहे.

पुणे : पर्वती मतदारसंघातील शकुंतला शिंदे संकुल, बॅडमिंटन हॉल, बिबवेवाडी येथील मतदान केंद्रावर अज्ञात व्यक्तीने बोगस मतदान केल्याची तक्रार एका मतदाराने केली आहे.

Vidhan Sabha 2019 : मतदानाच्या टक्केवारीत 'हा' जिल्हा आघाडीवर; महानगरांकडून निराशाच 

या मतदान केंद्रावर अभियंता अमोल दिलीप देशपांडे हे सकाळी सव्वाआठ वाजता मतदानासाठी गेले होते. परंतु, त्यापूर्वीच सकाळी साडेसात वाजता अन्य एका व्यक्तीने त्यांच्या नावावर मतदान केल्याचे आढळून आले. यापूर्वीही लोकसभा निवडणूकीत देशपांडे यांच्या नावावर याच व्यक्तीने बोगस मतदान केल्याची घटना घडली होती. ही बाब देशपांडे यांनी मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर देशपांडे यांच्या नावावर टेंडर (प्रदत्त) मतदान घेण्यात आले. 

भोर, शिरूरमध्ये ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड​

याबाबत देशपांडे यांनी जिल्हा निवडणूक कार्यालयात पर्वती मतदान नोंदणी अधिकारी यांच्या नावे तक्रार दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: complaint filed of duplicate voting in Bibwewadi Parvati assembly constituency