'कलेक्टर साहेब, आता किती बी पाऊस पडू द्या, अजिबात घाबरत नाही...'

'कलेक्टर साहेब, आता किती बी पाऊस पडू द्या, अजिबात घाबरत नाही...'

उरुळी कांचन (पुणे) : ढगफुटी सदृश्य पावसामुळे वळती (ता. हवेली) येथील हजारो एकरांवरील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळावा यासाठी शासन दरबारी शेतकऱ्यांच्या व्यथा पोचवल्या जातील. शासनामार्फत शेतकऱ्यांना तातडीने मदत देता यावी यासाठी महसूल विभाग व कषी विभागाने वळती येथील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पुढील सात दिवसांच्या आत पुर्ण करावेत. असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सोमवारी (ता. १९) वळती येथे दिले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तर दुसरीकडे उरुळी कांचनसह पुर्व हवेलीमधील सर्वच ओढ्या-नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने, पावसाचे पाणी थेट शेतात व नागरीवस्तीत शिरत असल्यानेच मोठे आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी नागरीकांच्याकडून मिळाल्या आहेत. नागरीकांच्या तक्रारी लक्षात घेता, ओढे-नाल्यावरील अतिक्रमणे कायमस्वरुपी हटविण्यासाठी हवेलीमधील लोकप्रतिनीधी व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लवकरच बोलविणार येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली. 

वळती हद्दीतील घाटमाथ्यावर रविवारी (ता. १८) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख सोमवारी (ता. १९) सकाळी वळती येथे आले होते. यावेळी डॉ. देशमुख व आमदार अशोक पवार यांनी ग्रामस्थांच्या समवेत वळती परीसरात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना वरील आदेशाबाबत डॉ. देशमुख यांनी माहिती दिली. 

यावेळी आमदार अशोक पवार, ज्येष्ठ उद्योगपती एल. बी. कुंजीर, हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसिलदार सुनिल कोळी, उरुळी कांचनचे मंडल अधिकारी दिपक चव्हाण, उरुळी कांचन तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अमित कांचन, शिवसेनेचे संजय उर्फ काका कुंजीर, उरुळी कांचनचे माजी उपसरपंच भाऊसाहेब कांचन, जनाई ग्रुपचे सागर कांचन, सागर कांचन, अर्जुन कांचन, बाळासाहेब कुंजीर, संतोष घोलप, जितेंद्र कुंजीर आदी उपस्थित होते. 

यावेळी वळती येथील नुकसानीबाबत बोलताना आमदार अशोक पवार म्हणाले, ''वळती हद्दीतील घाटमाथ्यावर रविवारी  सायंकाळी पाचच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने, वळती परीसरातील हजारो एकर क्षेत्रावरील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील हजार एकरावरील फळबागा, कांदा, तरकारी अशा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक नुकसानीत सापडला आहे. या पावसामुळे वळती परीसरातील छोटो-मोठे तलाव वाहtन गेल्याने, भविष्य़काळात या भागात पाण्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. कृषी, महसूलसह शासनाच्या सर्वच विभागांनी एकत्र येऊन, वळती ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. आमदार या नात्याने वळती येथील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.''

पावसाला अजिबात घाबरत नाही... 
पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना माहिती देताना, साठ वर्षीय विलास रामचंद्र कुंजीर यांनी मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. विलास कुंजीर यांच्या मालकिच्या चौदा एकरामधील उस, कांदा, बाजरी अशी विविध पिके रविवारी झालेल्या पावसामुळे वाहून गेली आहेत. तर त्यांच्या मालकीच्या दोन विहीरी मातीने व दगडधोंड्यामुळे बुजल्या आहेत. ही माहिती देत असताना, "साहेब, आत्ता किती पण पाऊस पडू द्या, पावसाला अजिबात घाबरत नाही...कारण नुकसान होण्याजोगे काही राहिलेच नाही. तर घाबरु कशाला असा प्रश्न विचारुन कुंजीर यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com