esakal | संगणकीकृत मोफत सातबारा व ई-पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर : तृप्ती कोलते- पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

संगणकीकृत मोफत सातबारा व ई-पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर : तृप्ती कोलते- पाटील

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : ‘राज्य सरकारच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने नागरिकांच्या सोयीची, पारदर्शक व बिनचूक सुविधा दिली जात आहे. त्या अंतर्गत संगणकीकृत सातबारा मोफत मिळणार आहे तर पीक पाहणीची नोंद मोबाईलवरून करता येणार आहे. असे विविध उपक्रम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहेत.’ असे हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते- पाटील यांनी सांगितले.

मोफत संगणकीकृत सात- बारा उतारा व शासन आपल्या दारी हा उपक्रम महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त राज्य सरकारच्या वतीने आगळंबे येथील श्रीजित लॉन्स येथे आयोजित केला होता. तहसीलदार कोलते- पाटील यांच्या हस्ते उदघाटन झाले. कुडजे तलाठी सजा अंतर्गतच्या कुडजे, आगळंबे व खडकवाडी गावातील नागरिकांसाठी आयोजित केला होता. त्यावेळी तहसीलदार बोलत होत्या. कोथरूडचे मंडलाधिकारी प्रमोद भांड, कुडजेच्या तलाठी प्रगती मोरे यांनी याचे आयोजन केले होते.

हेही वाचा: पुसद: तलाठी ते सहाय्यक वनसंरक्षक आशिषची उंच भरारी !

हवेली पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब मोकाशी, जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, नायब तहसीलदार संजय भोसले, आगळंबेचे सरपंच विलास वांजळे, कुडजेच्या सरपंच मानसी सोनवणे, माजी सरपंच दत्तात्रेय पायगुडे, उपसरपंच समीर पायगुडे, उपसरपंच विकी मानकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, मतदार संघ प्रमुख नितीन वाघ, अभिजित तावरे, दिनेश पायगुडे, संतोष पायगुडे, दत्ता घुमे, अनंता पारगे, बाळासाहेब निढाळकर, अजित पायगुडे, अजय गेंगाने व महसूल विभाग आणि पंचायत समिती हवेलीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा: रत्नागिरी पालिकेत वाहू लागले निवडणुकीचे वारे

‘निवडणुकीचे ओळखपत्र हरवले होते. या उपक्रमात माझ्याकडून अर्ज भरून घेतला आणि भरलेला अर्ज गावातील ‘बीएलओ’कडे देण्यास सांगितले आहे.’

-अजित पायगुडे, कुडजे

‘शेतकऱ्याला सातबारा काढायला गेलं की, आज या, उद्या या, असं सांगितलं जायचं किंवा तलाठी शासकीय कामानिमित्त उपस्थित नसायचे. अशी परिस्थिती होती. राज्य सरकारने सातबारा ऑनलाइन केल्यामुळे आमची सोय झाली. या उपक्रमाचा मला मोफत सातबारा मिळाला.’

-संतोष पायगुडे, आगळंबे

‘माझ्या दोन मुलींचे आधार कार्ड काढायचे होते. कोरोनामुळे बाहेर जाऊ शक्यत नव्हतो. या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात आमच्या गावातच आधार कार्डची काढण्याची व्यवस्था झाली.’

-मनोज पायगुडे, कुडजे

शासन आपल्या दारी मधील सुविधा व लाभार्थी

मोफत संगणकीकृत सात- बारा उतारा- २२९

उत्पन्न दाखले- ४२

रेशनकार्ड दुरुस्ती, नवीन नोंद- ३३

अन्नधान्य पुन्हा सुरु केले- १६

आरोग्य तपासणी- ३५

कोरोनाची लसीकरण- १३०

कोरोना तपासणी - २१

निवडणूक ओळखपत्र वाटप, दुरुस्ती- ४६

मनरेगा- २०

गोपीनाथ मुंढे शेतकरी विमा- १०

यासह अन्य विषय- ३२

अशा विविध योजनेचा लाभ एकूण- ६१४

loading image
go to top