esakal | ह्द्य पिळवटून टाकणारी बातमी : 'दोपहर की थोडी खिचडी रात को खाते थे...'
sakal

बोलून बातमी शोधा

lab.jpg

लॉकडाऊन में हमने आलू खाकर दिन गुजारे है..अब बारिश का मौसम शुरु होगा. गाव पहुँचकर खेती-बाडी कर लेंगे, वापस आने का अभी सोचा नही है.. अशा शब्दांत इतर परप्रांतीय मजूरांनीही भावनेला वाट करुन दिली.

ह्द्य पिळवटून टाकणारी बातमी : 'दोपहर की थोडी खिचडी रात को खाते थे...'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी ः ''लॉकडाऊन में हमे खाने के लिए खिचडी देती जाती थी ।.. उस में से थोडी रात को खा लेता था ... हमारी पत्नी आणि 2 बच्चे गॉंव में है.. 3 महिने से उन को पैसा भेज नही पाए.. अब गॉंव जाकर रोजगार की तलाश करुँगा'', अशी करुण कहाणी बिहारमधील मजूर बिरबल सहा यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा - पुण्यात कोथरूड संदर्भात महापौर मोहोळ यांचा मोठा खुलासा 

राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्या पुढाकाराने, शहरात अडकलेल्या कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश, बिहार आदी राज्यांतील स्थलांतरीत कामगार, मजूर, भाविक आणि विद्यार्थ्यांसाठी मंगळवारपासून बससेवा सुरु केली आहे. वैद्यकीय तपासणी झाल्यावर बस फलाटावर कधी उभी राहणार याच्या प्रतीक्षेत सहा हे उभे होते. त्यावेळेस सहा यांच्याबरोबरच इतर परप्रांतीय लोकांनी "सकाळ'कडे भावना व्यक्त केल्या. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सहा म्हणाले, "माझे आई-वडील वारले आहेत. गावाकडे फक्त पत्नी आणि 2 मुले आहेत. गावी पत्नी देखील मजुरी करुन उदरनिर्वाह करत आहे. इथे चांगली मजुरी मिळते म्हणून लॉकडाऊन संपल्यावर कामावर परत येणार आहे.'' 

आणखी वाचा - पुण्यात परप्रांतीय मजुरांकडे दुर्लक्ष का?

छत्तीसगड येथील बिगारी मजूर भागबली म्हणाले, "मागील 3 महिन्यांपैकी केवळ 5 ते 6 दिवस काम करता आले. खाण्या-पिण्यासाठी काही मिळाले नाही. ठेकेदाराने 5 हजार रुपये ऍडव्हान्स दिले. त्यावरच, आम्ही आतापर्यंत उदरनिर्वाह केला. परत उचल मागितली. परंतु, दिली नाही. गावी जाऊन काही तरी काम करणार. इथे लॉकडाऊन वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे, परत येणार नाही.'' 

बारिश शुरु होगी..तब खेती-बाडी करेंगे । 
लॉकडाऊन में हमने आलू खाकर दिन गुजारे है..अब बारिश का मौसम शुरु होगा. गाव पहुँचकर खेती-बाडी कर लेंगे, वापस आने का अभी सोचा नही है.. अशा शब्दांत इतर परप्रांतीय मजूरांनीही भावनेला वाट करुन दिली.

आणखी वाचा - पुण्यात कोथरूड संदर्भात महापौर मोहोळ यांचा मोठा खुलासा