पुण्यात विद्यार्थी-घरमालक वाद शिगेला; साहित्य बाहेर फेकून देण्याचे प्रकार

 conflict between landlord students for rent in pune
conflict between landlord students for rent in pune

पुणे : लाॅकडाऊनमुळे विद्यार्थी पुणे सोडून गावाकडे गेलेले असल्याने पूर्ण भाडे द्यायचे की  त्यात सवलत मिळाली पाहिजे यावरून घरमालकांसोबत वाद होऊन सामान बाहेर फेकून देण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातून नवेच वाद निर्माण होत असल्याने घरमालक व विद्यार्थी यांची डोकेदुखी वाढत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'कोरोना'च्या भितीने पुण्यातील मेस, हाॅटेल, चहाच्या टपऱ्या बंद झाल्या, शाळा, महाविद्यालयेही बंद झाल्याने विद्यार्थी गावाकडे निघून गेले. मार्च महिन्याचे पूर्ण भाडे विद्यार्थ्यांनी दिलेले असल्याने तेव्हा काही अडचण आली नाही. मात्र, एप्रिल महिन्याच्या १० तारखेपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना भाडे भरता आले नसल्याने घरमालकांकडून फोनवर फोन सुरू झाले. तसेच पुण्यात जे भाडेकरू कुटुंबासाेबत रहात होते, तेही गावाकडे गेल्याने त्यांचे ही भाडे थकले. भाड्यावरून वाद सुरू झाल्याने राज्य शासनाच्या गृहनिर्माण विभागाने एप्रिल, मे जून या तीन महिन्यांमध्ये मालकांनी भाडेकरूंना भाड्यासाठी तगादा लावू नये, तसेच त्यांना घराबाहेर काढू नये अशी सूचना केली होती. त्यामुळे काही काळ हा वाद थांबला होता. 

चला वारीला : ना धावला अश्व उभा, रुसला लिंबाचा चांदोबा

कोरोना लाॅकडाऊनमध्ये सुट देण्यात येत असल्याने व्यवहार सुरळीत होत आहेत, पण विद्यार्थी अद्याप गावाकडेच आहेत. दोन महिने भाडे न आल्याने काही घरमालक रंगाकाम करायचे आहे, बांधकाम करायचे आहे अशी कारणे देऊन विद्यार्थ्यांना बाहेर काढत आहेत. काही दिवसांपूर्वी नारायण पेठेत मुलीला घरातून बाहेर काढल्याने मालकावर गुन्हा दाखल झाला होता. तसेच रविवारी कोथरूड भाडे न दिल्याने मुलांचे सामान बाहेर फेकून देण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यानंतर कारवाई होणार अशी शक्यता निर्माण होताच विद्यार्थी व घर मालकाने आपसात हे प्रकरण मिटवून घेतले. असे प्रकार पुण्यात वाढायला लागले असून, यातून समंजस्याने तोडगा काढणे आवश्यक आहे. 

यंदा राज्य मंडळाचा अभ्यासक्रम होणार कमी - दिनकर पाटील

५० टक्के भाडे दिले
"लाॅकडाऊनमुळे मी गावाकडे निघून आले, पण घरमालकांनी पूर्ण भाडे मागितले होते. त्यांच्याशी चर्चा करून आर्थिक अडचणी सांगितल्या. त्यानंतर पुढील महिन्यांचे ५० टक्के भाडे घेण्याचे त्यांनी कबूल केले, त्याचा आम्हाला दिलासा मिळाला."
- भक्ती देशपांडे, विद्यार्थीनी

पुण्यातील दोन खासदार देशातील टॉप फाईव्ह परफॉर्मर! वाचा सविस्तर रिपोर्ट

"बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. मालकांच्याही अडचणी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व मालकांनी चर्चा करून भाडे देण्याचा विषय सोडवावा. मालक विद्यार्थ्यांचे ऐकत नसतील तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत."
- महेश बडे, प्रतिनिधी, एमपीएससी स्टुडंट्स राईट्स 
धक्कादायक! पुण्यात केईएम हॉस्पिटलच्या टेरेसवरुन उडी मारुन महिलेची आत्महत्या

"कोरोना महामारीचे  संकट सर्वांवर आहे, त्यामुळे जेथे भाडेकरू कमकुवत आहे तेथे मालकाने समजून घ्यावे, तर जेथे मालकांची स्थिती खरीच वाईट आहे, तेथे भाडेकरूंनी मदत केली पाहिजे. वाद, कोर्टकच्यांमधुन दोघांच्याही डोक्याला ताप होईल."
- संजय संघवी,  शहराध्यक्ष, असोसिएशन आॅफ रियल इस्टेट एजंट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com