कोणतीही पूर्वसूचना न देता नियोजन केल्यामुळे लसीकरणात गोंधळ

पुणे महापालिकेने ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्याबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता नियोजन करण्यात आले.
Corona Vaccination
Corona VaccinationSakal

पुणे - महापालिकेने (Muncipal) ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण (Vaccination) सुरू करण्याबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता नियोजन (Management) करण्यात आले. शनिवारी सकाळी लसीकरण सुरू झाल्यानंतर कोव्हीशील्डचे (Covishield) ८४ दिवस पूर्ण झालेले अनेक नागरिक केंद्रांवर आलेले असताना त्यांना परत पाठविण्यात आल्याने शहरातील १५ केंद्रांवर दिसून आला. धनकवडीतील शिवशंकर पोटे दवाखान्यात गोंधळ झाल्याने पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली. (Confusion in Vaccination due to Planning without any Prior Notice)

शहरातील १५ केंद्रांवर आजपासून (ता. १९) ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करणार असल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी शुक्रवारी रात्री जाहीर केले. १५ ठिकाणी नियोजन करताना त्या ठिकाणचे ४५ च्या पुढील वयोगटासाठीचे लसीकरण बंद करण्यात आले. याबाबत नागरिकांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती.

Corona Vaccination
राष्ट्रवादीत नव्या कार्यकर्त्यांना मिळणार संधी - अजित पवार

शनिवारी ३० ते ४४ वयोगटासाठी ज्या १५ महापालिकेच्या दवाखान्यात लसीकरण सुरू करण्याचे नियोजन केले, तेथे गेल्या अनेक दिवसांपासून ४५वयाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. कोव्हीशील्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले आहेत, असे नागरिक तेथे गेल्यानंतर ४५ च्या पुढील गटातील लसीकरण होणार नाही, तुम्ही दुसऱ्या केंद्रावर जा असे सांगण्यात आले. यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह इतर नागरिकांना धावपळ करावी लागल्याने त्यांनी संताप व्यक्त करत आम्हाला इथेच लस द्या, ऐनवेळी आम्ही दुसरे केंद्र कुठे शोधायचे असा आग्रह धरला, पण दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी लस देण्यास नकार दिल्याने गोंधळ सुरू झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन कदम म्हणाले, ‘महापालिका प्रशासन मनमानी पद्धतीने लसीकरणाचे नियोजन करत असल्याने त्याच त्रास नागरिकांना होत आहे. ३० ते ४४ वयोगटाचे नियोजन करताना त्यांनी नागरिकांना पूर्वकल्पना देणे गरजेचे होते.

‘माझ्या पत्नीला दुसरा डोस देण्यासाठी पोटे दवाखान्यात गेलो होतो, पण तेथे ३० ते ४४ वयोगटासाठीच लस असल्याचे सांगण्यात आले. आम्हाला याबद्दल कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती. महापालिकेच्या या निर्णयामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले आहेत.’

- विकास जाधव, नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com