मोदी सरकार सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा टाकण्याचं काम करतंय; पुण्यात काँग्रेसचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

गेल्या महिन्यांपासून पेट्रोल -डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ही दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी शहर काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या उपस्थितीत आंदोलन केले. त्यावेळी थोरात यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.

पुणे : "आंतरराष्ट्रीय बाजारात एकीकडे कच्चा तेलाच्या किमती कमी होत आहे. दुसरीकडे मात्र देशात पेट्रोल-डिझेलचे दरवाढ सुरूच आहे. केंद्र सरकार ही दरवाढ करून सर्वसामान्य माणसाच्या खिशावर दरोडा टाकण्याचे काम करीत आहे,' अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सोमवारी टीका केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गेल्या महिन्यांपासून पेट्रोल -डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ही दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी शहर काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या उपस्थितीत आंदोलन केले. त्यावेळी थोरात यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, दीप्ती चवधरी, अभय छाजेड, कमल व्यवहारे, दत्ता बहिरट, गोपाळ तिवारी, रवी धंगेकर, वीरेंद्र किराड, सचिन आडेकर यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. " गरिबांच्या खिश्‍श्‍यावर डल्ला मारणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो,' " पेट्रोल-डिझेल दरवाढ कमी झालीच पाहिजे,' या व अशा कॉग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. 

Breaking : शरद पवार यांच्या सुरक्षा ताफ्यातील वाहनाचा अपघात

यावेळी बोलताना थोरात म्हणाले,"" सध्याच्या परिस्थितीत जनतेच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्‍यकता आहे. न्याय योजना सारखी योजना लागू करून सर्वसामान्य जनतेला चार पैसे देऊन अर्थव्यवस्था गतिमान करण्याची आवश्‍यकता आहे. अशा वेळेस केंद्र सरकार पेट्रोल -डिझेलच्या किमती वाढून सर्व सामान्य जनतेला अडचणीत आणण्याचे काम करीत आहे.त्यांच्या खिशातून पैसे काढण्याचे काम करीत आहे. त्यामुळे जनतेमध्ये जो उद्रेक आहे. त्याला वाचा फोडण्याचे काम काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते या आंदोलनाच्या माध्यमातून करीत आहेत. त्यांची दखल घेऊन केंद्र सरकारने त्वरित पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी कराव्यात.'' 
यावेळी मोहन जोशी यांच्यासह अनेकांनी भाषणे झाली. 

पुणे - मुंबई एक्सप्रेस वेवर विचित्र अपघातात 2 ठार; वाहतूक विस्कळीत

शहर काँग्रेसच्या या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. परंतु खुद्द मंत्रीच आंदोलनात सहभागी होत असल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी घाईघाईत या आंदोलनाला परवानगी दिली. परवानगी देताना ही काही अटी-व शर्तींवर पोलिसांकडून ही परवानगी देण्यात आली. त्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांनी दिलेल्या वागणुकीबद्दलची चर्चा रंगली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress agitation in Pune to protest petrol price hike