Vidhan Sabha 2019 : पुण्यातील निष्ठावान कुटुंबांना काँग्रेसच्या पहिल्या यादीत संधी

मंगेश कोळपकर
रविवार, 29 सप्टेंबर 2019

कॉंग्रेसच्या प्रसिद्ध झालेल्या पहिल्या यादीत पुणे शहराचे अध्यक्ष रमेश बागवे यांना कॅंटोन्मेंट, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांना पुरंदरमधून तर, विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांनाही भोरमधून पक्षाच्या पहिल्या यादीत स्थान मिळविले आहे. पक्षाशी निष्ठावान असलेल्या कुटुंबातील सदस्यांना संधी देत कार्यकर्त्यांची उमेद वाढविण्याचा कॉंग्रेसने प्रयत्न केला आहे. 

पुणे : काँग्रेसच्या प्रसिद्ध झालेल्या पहिल्या यादीत पुणे शहराचे अध्यक्ष रमेश बागवे यांना कॅंटोन्मेंट, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांना पुरंदरमधून तर, विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांनाही भोरमधून पक्षाच्या पहिल्या यादीत स्थान मिळविले आहे. पक्षाशी निष्ठावान असलेल्या कुटुंबातील सदस्यांना संधी देत कार्यकर्त्यांची उमेद वाढविण्याचा कॉंग्रेसने प्रयत्न केला आहे. 

बागवे सध्या पुणे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आहेत. या पूर्वी दोन वेळा ते आमदार होते. तसेच 2009 ते 14 दरम्यान पक्षाने त्यांना गृहराज्यमंत्री पदाचीही संधी दिली होती. बागवे गेल्या दोन वर्षांपासून शहराध्यक्ष आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाले तेव्हापासूनच त्यांनी पुन्हा लढण्याची तयारी सुरू केली आहे.

काँग्रेसची पहिली 51 उमेदवारांची यादी जाहीर

मूळचे सासवडचे असलेले जगताप गेल्या दीड वर्षांपासून जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांचे वडील चंदूकाका जगताप यांनी 1995 आणि 99 मध्ये विधानसभा लढविली होती. परंतु, त्यात त्यांना यश आले नव्हते. त्यामुळे कॉंग्रेसने त्यांना 2004 मध्ये विधान परिषदेवर संधी दिली. 2014 च्या निवडणुकीत संजय जगताप यांनी निवडणूक लढविली होती. परंतु, आघाडीतून कॉंग्रेसतर्फे संजय यांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. संग्राम थोपटे हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंत थोपटे यांचे चिरंजीव आहेत.

युतीच्या घोषणेआधीच शिवसेनेने वाटले एबी फॉर्म

अनंतराव यांनी भोरमधून कॉंग्रेसची चार वेळा जागा जिंकली आहे. त्यांची परंपरा संग्राम यांनी दोन वेळा राखली आहे. आता तिसऱ्यांदा ते निवडणूक रिंगणात आहे. थोपटे कुटुंब हे देखील कॉंग्रेसचे निष्ठावान समजले जाते. बागवे यांचा भाजपचे माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्याशी तर, जगताप यांची शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशी तर, थोपटे यांची शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांच्याशी लढत होण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress gave opportunities to loyalist families in pune for assembly election 2019