काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू; दोन मोठे नेते उद्या भेटणार!

Congress-NCP-Maharashtra
Congress-NCP-Maharashtra

बारामती : राज्यातील सत्ता समीकरणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे रविवारी (ता. 26) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी बारामतीत येणार आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने मुसंडी मारत जवळपास शंभरी गाठली. त्यानंतर आता भाजपला शह देत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे नवीन सत्ता समीकरण उदयाला येणार का? अशी राज्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

सत्ता समीकरणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित नेमकी काय भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. सोनिया गांधी यांनी देखील दूरध्वनीवरून शरद पवार यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. उद्या बाळासाहेब थोरात बारामतीत येऊन शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याने दिवाळीनंतर राज्याच्या राजकारणात काय भूकंप होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीने सेनेला बाहेरून पाठिंबा द्यायचा, की विरोधक म्हणून काम करायचे, याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची काय भूमिका राहते, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे आमदार जास्त निवडून आले असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका या सर्व समीकरणांमध्ये नेमकी काय असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी थोरात आणि पवार यांची भेट होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com