
महाविकास आघाडीचे शिवसेनेबरोबर हे सरकार झाले; पण त्यांनी हिंदुत्वाला कुठेही मुरड घातली नाही. प्रबोधनकारांचे तत्व घेऊन, 'कॉमन मिनिमम प्रोग्राम' घेऊन आमच्याबरोबर आले आहेत, अशी स्पष्टोक्ती माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
पुणे - महाविकास आघाडीचे शिवसेनेबरोबर हे सरकार झाले; पण त्यांनी हिंदुत्वाला कुठेही मुरड घातली नाही. प्रबोधनकारांचे तत्व घेऊन, 'कॉमन मिनिमम प्रोग्राम' घेऊन आमच्याबरोबर आले आहेत, अशी स्पष्टोक्ती माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
बालगंधर्व कलादालनातील प्रबोधन महोत्सवात ते बोलत होते. कामगार सेनेचे डॉ. रघुनाथ कुचिक, पत्रकार ज्ञानेश महाराव, सचिन ईटकर, संवादचे सुनील महाजन यावेळी उपस्थित होते. पुत्र सांगती चरित पित्याचे ही बाळासाहेब ठाकरे यांच्या अप्रकाशित भाषणाची चित्रफित यावेळी देखविण्यात आली.
पुण्यात कचरा प्रक्रिया प्रकल्पाला भीषण आग; मशिनरी जळून खाक
शिंदे म्हणाले, "प्रबोधनकारांमध्ये समाज घडविण्याची ताकद होती, हेच उद्धव ठाकरे यांनी उचलले. ते खरे हिंदुत्व उचलून आमच्याबरोबर आले आणि भाजपला बाजूला गेले. तीन दशकांपूर्वीच शिवसेनेने हे पाऊल उचलले पाहिजे होते. नवा समाज घडवायचा असेल, तर प्रबोधनकारांच्या विचारांना पर्याय नाही. नव्या पिढीपुढे ही शिदोरी उघडूया. जाता, धर्मापेक्षा आपला समाज, मानवता खूप मोठी हे त्यांना आपण सांगूयात."
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुण्यात जातीय कर्मठ वृत्तीचे लोक असताना नामदार गोखले, महात्मा फुले, लोकमान्य टिळकही जन्मले. धर्माच्या,जातीच्या नावावर आपले समाज व्यवस्था उभी राहिली, तर ती कोसळायला वेळ लागणार नाही. त्यामुळे समतेचा विचार घेऊन पुढे जाण्याची गरज आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
या महोत्सवात आज प्रबोधन’ या विषयावर डॉ. नवनाथ शिंदे यांचे व्याख्यान झाले त्या वेळी प्राध्यापक हरी नरके यांचेही भाषण झाले. सुरुवातीस प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकातील ‘आई थोर तुझे उपकार’ या कथेचे वाचन अभिनेते दीपक रेगे यांनी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सुरेश राऊत यांनी त्यांचे शिल्प साकारले.
पुण्यात पुन्हा होणार एल्गार परिषद
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, "पुणे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अड्डा. त्या पुण्यात बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकारांची जयंती साजरे होणे हा ऐतिहासिक प्रसंग आहे. प्रबोधनकारांच्या पत्रकारारितेची धडपड ही समाज सुधारणेसाठी होती. त्यांनी अनिष्ट परंपरांना झोडून काढले. पण सत्य त्यांनी सांगितलेच."
Edited By - Prashant Patil