नाराज आमदाराच्या समर्थकांनी जाळला काँग्रेसचा बॅनर 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

काही कार्यकर्त्यांच्या हातात मल्लिकार्जुन खर्गे व बाळासाहेब थोरात यांचे फोटोही होते. नाराजी वाढत गेल्याने कार्यकर्त्यांनी व पदाधिका-यांनी कॉग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचा निषेध करीत निषेधाचा बॅनर जाळला.

भोर(पुणे) : काँग्रेसचे निष्ठावंत असलेले आणि भोर विधानसभा मतदारसंघातून तिस-यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आमदार संग्राम थोपटे यांचा राज्यमंत्रीमंडळात समावेश होणार नसल्यामुळे भोरमधील काँग्रेसप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. एवढेच नाही तर आमदार संग्राम थोपटेंच्या समर्थकांनी काँग्रेसचा निषेध करीत निषेधाचा बॅनरली जाळला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रविवारी (ता.२९) रात्री उशीरापर्यंत संग्राम थोपटे यांचे यादीत असलेले नाव सोमवारी (ता.३०) सकाळी वगळल्याचे समजतात सोशल मि़डीयावर काँग्रेसच्या काही वरिष्ठ पदाधिका-यांवरील नाराजी व निषेधाच्या पोस्ट सुरु झाल्या. दहाच्या सुमारास नगरपालिकेसमोर काँग्रेसच्या पदाधिका-यांनी एकत्र येऊन कॉग्रेसच्या विरोधात घोषणा दिल्या.

शरद पवार अजित पवारांना म्हणाले, संधीचं सोनं करा; 14 नावे निश्चित

काही कार्यकर्त्यांच्या हातात मल्लिकार्जुन खर्गे व बाळासाहेब थोरात यांचे फोटोही होते. नाराजी वाढत गेल्याने कार्यकर्त्यांनी व पदाधिका-यांनी कॉग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचा निषेध करीत निषेधाचा बॅनर जाळला. यावेळी नगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते सचिन हर्णसकर, उपनगराध्यक्ष गणेश पवार, सुमंत शेटे, नगरसेवक देविदास गायकवाड, अमित सागळे, समीर सागळे, सादिक फरास, माजी नगराध्यक्ष तात्या सागळे, बंडूशेठ गुजराथी, विश्वनाथ रोमण, तानाजी तारु, बजरंग शिंदे, तौफीक आतार आदींसह नगरपालिकेतील कॉग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

शिवसेनेचे ठरलं; ग्रामीण भागाला प्राधान्य आणि दर दोन वर्षांनी...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MLA Sangram Thopte supporters protest against congress