

Jay Pawar Reacts to Baramati Election Buzz
Esakal
कल्याण पाचांगणे, सकाळ वृत्तसेवा माळेगाव : बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून या निवडणुकीत काँग्रेस लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागली आहे. या पोटनिवडणुकीबाबत अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारामती विधान सभा पोट निवडणूक पुर्णतः भावनिक आहे. अजितदादांचे अकाली निधन झाले. अद्याप बारामतीकर दु:खातून सावरले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, हे पवार साहेबांपासून सर्वांना वाटत असल्याचं जय पवार म्हणाले. Baramati by poll may not be unopposed Congress signals participation Jay Pawar reacts