esakal | Pune : स्वस्तात घर देण्याच्या नावाने ग्राहकांची फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे: कळव्यात गाळा देण्याच्या नावाने तिघांनी केली 50 लाखाची फसवणूक

Pune : स्वस्तात घर देण्याच्या नावाने ग्राहकांची फसवणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवित ग्राहकांकडून पैसे घेतल्यानंतरही त्यांना मुदतीत सदिनका दिल्या नाहीत, त्याचबरोबर ग्राहकांचे पैसेही परत न करता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी नामवंत बांधकाम व्यावसायिक कंपनी व त्यांच्या भागीदारांविरुद्ध सासवड पोलिस ठाण्यात गुरूवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणामध्ये 17 ग्राहकांची फसवणूक झाली आहे.

सचिन अशोक अग्रवाल (रा.सिटीस्क्वेअर, शिवाजीनगर), अशोक नारायण भोसले, प्रतिक्षा अशोक भोसले (दोघेही रा.वाकड), प्रमोद नारायण भोसले (रा.पाटील कॉम्प्लेक्‍स, औंध रोड, खडकी), नितीन बिपीन शहा (रा. शिवाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शाहरुख ताजुद्दीन अत्तार (वय 28, रा.कोंढवा बुद्रुक) यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन फसवणूकीसह महाराष्ट्र मालकी फ्लॅट कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार 13 ऑगस्ट 2015 ते 9 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडला आहे.

हेही वाचा: योगींच्या 'अब्बा जान'च्या वक्तव्यावर काँग्रेसनं दिलं प्रत्युत्तर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन अग्रवाल हे "मेपल प्रमोटर्स ऍन्ड बिल्डर्स'चे मालक आहेत, तर भोसले कुटुंबीय जागामालक आहेत. फिर्यादीचे कोंढवा बुद्रुक येथे बांगड्या विक्रीचे दुकान आहे. फिर्यादी 13 ऑगस्ट 2015 रोजी "मेपल प्रमोटर्स ऍन्ड बिल्डर्स'च्या शिवाजनगर येथील कार्यालयात येथे गेले. तेथे त्यांना "आपले घर कोंढवा ऍनेक्‍स' हा बांधकाम प्रकल्प पसंत पडला. त्यामुळे त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानुसार, फिर्यादींनी 20 हजार रुपये आगाऊ नोंदणीसाठी भरले.

हेही वाचा: "जे ममता बॅनर्जी-मायावतींनी करुन दाखवलं ते पवारांना जमलं नाही"

त्यानंतर त्यांच्या नावे "आपले घर कोंढवा ऍनेक्‍स'मधील "ए' इमारतीच्या तिसऱ्या मजऱ्यावरील 310 क्रमांकाची सदनिकेची नोंदणी झाली. त्यानंतर फिर्यादीनी वेळोवेळी 4 लाख 37 हजार रुपये भरले. पुरंदर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात "मेपल प्रमोटर्स ऍन्ड बिल्डर्स'चे मालक सचिन अग्रवाल यांच्यातर्फे नितीन बिपीन शहा यांनी खरेदीखतही करुन दिले. त्यानंतर ठरलेल्या करारनाम्यानुसार, बांधकाम व्यावसायिकांनी फिर्यादींना 36 महिन्यानंतर घराचा ताबा देणे गरजेचे होते. परंतु, आजपर्यंत संबंधीत इमारतीचे काम पुर्ण झाले नाही, तसेच त्यांना सदनिकेचा ताबाही मिळाला नाही. फिर्यादीने वेळोवेळी सचिन अग्रवाल, भोसले कुटुंबीय व नितीन शहा यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र त्यांनी सदनिकेचा ताबा किंवा त्यांनी भरलेले पैसेही परत केले नाहीत. फिर्यादीप्रमाणेच बांधकाम व्यावसायीक, त्यांच्या भागीदारांनी 16 जणांची फसवणूक केली आहे.

loading image
go to top