पुण्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावले

Control of oxygen supply from Disaster Management Cell in Pune by ZP
Control of oxygen supply from Disaster Management Cell in Pune by ZP
Updated on

पुणे : भविष्यात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्याचे दृष्टीने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करून संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. राज्यात पुरेसे ऑक्सिजनचे उत्पादन होऊनसुध्दा वितरण योग्य प्रकारे होत नसल्यामुळे काही ठिकाणी तात्पुरता तुटवडा होत आहे. रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा अखंडितपणे सुरु राहण्याकरीता जिल्हास्तरावर  समिती गठीत करण्यात आली आहे. समितीने दररोज ऑक्सिजनची गरज आणि ती पुरविणाऱ्या बॉटलिंग प्लांट्स बल्क सप्लायर्स यांच्या सतत संपर्कात राहून प्रत्येक रुग्णालयात वेळेत ऑक्सिजन प्राप्त होईल, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.

महत्त्वाची बातमी : पुणे जिल्ह्यातील `हा` भाग उद्यापासून सात दिवस राहणार बंद 

अधिकाऱ्यांवर जबाबदारी : 

- निवासी उपजिल्हाधिकारी : अन्य जिल्हाधिकारी कार्यालयांशी समन्वय साधून नियोजन करणे. 
- सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन : उत्पादकांशी समन्वय व बॉटलींग प्लॅंटमधून वाटपाचे नियोजन करणे.
- महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र : उत्पादनात वाढ व उत्पादकांशी समन्वय साधणे.
- प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे व पिंपरी : वाहतूक-टॅंकर समन्वय राहण्याबाबत नियोजन करणे.
- जिल्हा शल्य चिकित्सक :  रुग्णांना औषधोपचार करणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महापालिका आणि खासगी रुग्णालयांना प्रतिदिन लागणाऱ्या ऑक्सिजनची माहिती रुग्णालयानुसार संकलित करून निवासी उपजिल्हाधिकारी यांना द्यावी.
 - जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य अधिकारी : जिल्ह्यातील रुग्णांवर औषधोपचार करणाऱ्या सर्व सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महापालिका आणि खासगी रुग्णालयांना प्रतिदिन लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी नोंदविणे.

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी नियंत्रण कक्ष :

जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापनांतर्गत पावसाळ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाला ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातून ऑक्सिजन पुरवठ्याशी संबंधित अडचणी सोडविण्यात येणार आहेत.

Breaking : राज्य सरकारने रेडी-रेकनरच्या दरात केली वाढ; सर्वाधिक पुणे जिल्ह्यात तर...

संपर्क क्रमांक :

पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष : 020-26123371 

अन्न व औषध प्रशासन (एफडीए) : 022-26592364 

टोल फ्री: 1800222365 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com