
-सुवर्णा कांचन
उरुळी कांचन : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचा जमिनी विक्री हा सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. जमीन विक्रीचा विषय हा विधानसभेपर्यंत पोचला आहे. कारखान्याची प्रस्तावित शंभर एकर जमीन हवेली कृषि उत्पन्न बाजार समिती यांना विक्री करण्याच्या संचालक मंडळाच्या निर्णयाच्या विरोधात बचाव कृती समितीच्या वतीने विकास लवांडे, लोकेश कानकाटे, सागर गोटे, राजेंद्र चौधरी, अलंकार कांचन या सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेत संबंधितांना नोटिसा पाठविल्या आहेत.