नांदेडमधील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू तर खडकवासला येथे... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

खडकवासला येथील 21 वर्षीय तरुणाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर नांदेड येथील 55 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

किरकटवाडी (पुणे) : खडकवासला येथील 21 वर्षीय तरुणाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर नांदेड येथील 55 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. खडकवासला येथील एकूण रुग्ण संख्या आता पाच झाली असून त्यापैकी तीन रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत तर दोघांवर उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

खडकवासला येथील 21 वर्षीय तरुणाला ताप, सर्दी अशी लक्षणे जाणवू लागल्याने त्याची खासगी लॅबमध्ये कोरोना तपासणी केली असता त्या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉक्टर वंदना गवळी यांच्याकडून देण्यात आली. चार ते पाच दिवसांपूर्वी दात दुखत असल्याने उपचारासाठी हा तरुण दातांच्या दवाखान्यात गेला होता. त्यानंतर त्याला सर्दी,ताप असा त्रास होऊ लागल्याचे 'त्या' तरुणाच्या कुटुंबीयांकडून समजले. त्या तरुणाच्या कुटुंबातील इतर तीन व्यक्तीही खासगी लॅब मधून तपासणी करून घेणार असल्याची माहिती डॉक्टर वंदना गवळी यांनी दिली.

'पुण्याची पीएमपी व्हेंटिलेटरवर; करार रद्द करण्यासाठी कंत्राटदारांना नोटिस

दरम्यान, नांदेड येथील 55 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर मागील पंधरा दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या महिलेला मधुमेह, अस्थमा हे आजार असल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक होती. काल त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूच्या अगोदर दोन दिवसांपूर्वी तपासणीसाठी घेतलेल्या त्या महिलेच्या स्वॅबचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला होता. हवेली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे.

StartupStory: सोशल डिस्टन्सिंगसाठी तरुणानं डोकं लढवलं; तुम्हीही कराल कौतुक

खडकवासला येथील रुग्ण आढळलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध ताडी व गावठी दारू विक्री करणारे आहेत. या परिसरामध्ये व्यसनी लोकांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी रुग्ण आढळलेला संपूर्ण परिसर सील करण्यात येणार असल्याचे सांगितले. खडकवासला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रुग्ण आढळलेल्या परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona affected woman dies in Nanded