बारामतीतील कोरोनाची स्थिती गंभीर!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या आज 44 वर गेली.  नागरिकांनी आता स्वयंस्फूर्तीने घरात थांबून संपर्क टाळण्याचा प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. 'माझा रक्षक मीच' ही भूमिका आता प्रत्येकाने निभावली तरच ही साखळी तुटण्यास मदत होणार आहे. 

बारामती : शहरातील कोरोना रुग्णांची स्थिती गंभीर बनत चालली आहे. काल 110 रुग्ण आढळल्यानंतर आजही रुग्ण संख्या तब्बल 99 इतकी आहे. बारामतीच्या कोरोनाग्रस्तांची संख्या आज 1100 चा टप्पा पार करुन पुढे गेली.

पुणे : 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग'पद्धतीनं सुरू झालंय भुयारी मेट्रोचं काम!​

कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या आज 44 वर गेली.  नागरिकांनी आता स्वयंस्फूर्तीने घरात थांबून संपर्क टाळण्याचा प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. 'माझा रक्षक मीच' ही भूमिका आता प्रत्येकाने निभावली तरच ही साखळी तुटण्यास मदत होणार आहे. 

काल बारामतीत उच्चांकी म्हणजे तब्बल 200 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुई ग्रामीण रुग्णालय तसेच सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात तपासण्या सुरु झाल्यामुळे रुग्ण संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. यातही दिलासादायक बाब म्हणजे लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या यात अधिक आहे. 

हॉटेल व्यावसायिकांचे 'वाजले की बारा'; लॉकडाउनच्या नव्या नियमावलीतही परवानगी नाहीच!​

काल घेतलेल्या 200 आरटीपीसीआरपैकी 77 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले. शासकीय अँटीजेन तपासण्यात 37 तर खाजगी मध्ये 12 जण पॉझिटीव्ह सापडले. यात शहरातील 60 तर ग्रामीण भागातील 39 रुग्णांचा यात समावेश आहे. 

शहर व तालुक्यातील सर्वच भागातून आता रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. दरम्यान नटराज नाट्य कला मंडळाने बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात सुरु केलेल्या कोविड केअर सेंटरमुळे किमान दोन दिवस तरी प्रशासनाला दिलासा मिळणार आहे. या शिवाय एमआयडीसीमध्ये प्रेरणा महिलाश्रमात फक्त महिलांसाठी 100 बेडचे स्वतंत्र कोविड केअर  सेंटर सुरु करणार असल्याची माहिती नटराजचे अध्यक्ष नगरसेवक किरण गुजर यांनी दिली. या दोन कोविड केअर सेंटरमुळे किमान तीन दिवस तरी बेडसची चिंता प्रशासनाला राहणार नाही, मात्र रुग्ण संख्या याच पटीत वाढत राहिली तर मात्र अजून व्यवस्था तातडीने उभी करावी लागणार आहे. 

चारित्र्याच्या संशयावरून 'त्याने' पत्नीला पुलावरून नदीत ढकलले; संगमपुलाजवळ घडली घटना​

....यांच्यासाठी सर्वाधिक लक्ष देण्याची गरज...
ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे व ज्यांच्याकडे 24 तास लक्ष देण्याची व अशा रुग्णांचा जीव वाचविण्यास सर्वाधिक प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यांना अतिदक्षता विभागात जागा मिळणे व व्हेंटीलेटरची गरज भागविण्यासाठी खाजगी व सरकारी डॉक्टरांची समिती तातडीने स्थापन करण्याशिवाय आता गत्यंतर उरलेले नाही. या शिवाय रुग्णांची ने आण करण्यासाठी रुग्णवाहिका व्यवस्थापन समितीचीही गरज असून आता स्वयंसेवी संस्था व पदाधिका-यांनीही या कामात आपला सहभाग देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

पदाधिकाऱ्यांनी पुढे यावे...
कोरोनाची स्थिती गंभीर बनू पाहत असताना आता स्थानिक पदाधिकारी व स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाच्या मदतीसाठी पुढे यायला हवे, कोविड केअर सेंटर सुरु करुन रुग्णांना दिलासा देण्याची आता निकड तयार झाली आहे
- किरण गुजर, अध्यक्ष, नटराज नाट्य कला मंडळ, बारामती.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona condition is critical in Baramati