

पुणे : कोरोनाची निदाच चाचणी करण्यासाठी पुण्यातील गोळविलकर मेट्रोपोलिस लॅबला भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मान्यता दिली आहे.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार परदेशातून आलेल्या, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किंवा कोरोनाची लक्षणे असणाऱयांचे वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी डॅक्टरांचे प्रस्क्रिप्शन आणि सरकारी ओळखपत्र अत्यावश्यक असल्याची माहिती पुण्याच्या गोळविलकर मेट्रोपोलिसचे मुख्य पॅथॉलॉजिस्ट मनीष कारेकर यांनी दिली.
coronavirus : अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना पोलिसांकडून मिळणार पास
कोरोनाची तपासणी 24 तासांमध्ये केली जाते. त्यात निदान झालेल्या कोरोनाच्या रुग्णाची माहिती तातडीने आयसीएमआरला कळविली जाते. या चाचणीसाठी सरकारने मान्यता दिलेले किट उपलब्ध आहे. रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थ (स्वॅब) तपासणीसाठी घेतला जातो. या स्वॅब घेण्याच्या पद्धतीचे प्रशिक्षण प्रयोगशाळा तंत्रज्ञांना दिले आहे. यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण संरक्षक वेष, मास्क आणि गॉगल देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Corona Virus : पुण्यात आता 'या' खासगी लॅबमध्ये होणार कोरोनाची चाचणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.