कोरोनामुळे सात महिन्यांपासून क्लासेसला टाळे; हजारो कोटींची उलाढाल ठप्प!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

राज्यात जवळपास दीड लाख आणि त्याहून अधिक छोटे-मोठे खासगी शिकवणी वर्ग आणि कोचिंग क्लासेस आहेत. एका क्लासमध्ये पाच ते दहा जण कार्यरत आहेत.

पुणे : इयत्ता पाचवी ते बारावीसाठीची खासगी शिकवणी वर्ग चालविणारे, विविध स्पर्धा परीक्षा, केंद्र आणि राज्य शासनाच्या पद भरतीत मार्गदर्शन करणाऱ्या लहान-मोठ्या कोचिंग क्लासेसची हजारो कोटी रूपयांची उलाढाल सध्या कोरोनामुळे ठप्प आहे. गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील जवळपास दीड लाख खासगी कोचिंग क्लासेस बंद आहेत. परिणामी, खासगी कोचिंग क्लासेसचे आर्थिक गणित विस्कटले आहे.

होम क्वारंटाईन झाल्यानंतरही अजित पवारांचा कामाचा धडाका सुरूच

राज्यात जवळपास दीड लाख आणि त्याहून अधिक छोटे-मोठे खासगी शिकवणी वर्ग आणि कोचिंग क्लासेस आहेत. एका क्लासमध्ये पाच ते दहा जण कार्यरत आहेत. यात विद्यार्थ्यांना शिकविणारे प्रशिक्षक, क्लासच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी, अशा सुमारे पाच ते दहा लाख नागरिकांचा उदरनिर्वाह हा खासगी क्लासेसवर अवलंबून आहे. कोरोनामुळे खासगी क्लासेसला लागलेले टाळे अद्याप उघडले गेले नसल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

बारामती : पोलिसांच्या ताण-तणाव व्यवस्थापनासाठी पोलिस अधीक्षक सरसावले!​

दरवर्षी राज्यात ३२ लाखांहून अधिक विद्यार्थी हे दहावी, बारावीची परीक्षा देतात. तर जवळपास अडीच-तीन लाख विद्यार्थी जेईई, नीट, सीईटी या परीक्षा देतात. तर लाखो विद्यार्थी राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करत असतात. त्याशिवाय हजारो विद्यार्थी सनदी लेखापाल, कंपनी सचिव, बँकिंग या परीक्षांची तयारी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून करत असतात. परंतु सध्या खासगी कोचिंग क्लासेस बंद असल्याने त्यावर आधारित असणाऱ्या नोकरदारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. तर क्लासेस सुरू नसल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणी देखील वाढल्या आहेत.

अखेर रवींद्र बऱ्हाटे फरारी म्हणून घोषित; बऱ्हाटेविषयी माहिती देण्याचे पुणे पोलिसांचे आवाहन​

"राज्यातील बहुतांश कोचिंग क्लासेस चालकांनी खासगी शिकवणी वर्ग चालविण्यासाठी जागा भाड्याने घेतलेली असते. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून क्लासेस बंद असल्यामुळे अनेकांचे भाडे थकले आहे. तसेच मार्गदर्शन मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याशिवाय क्लासेसवर उदरनिर्वाह असणाऱ्याची स्थिती अत्यंत बिकट झाली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे."
- प्रशांत ढाकणे, कोषाध्यक्ष, कोचिंग क्लासेस असोसिएशन महाराष्ट्र

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona has stalled thousands crores rupees turnover of coaching classes