esakal | बारामतीकरांसाठी महत्त्वाची बातमी : कोरोनासंदर्भातील हेल्पलाईन अखेर झाली सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

corona helpline.jpg

कोरोनासंदर्भात शहरातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयाबाबत तसेच रुग्णवाहिकेबाबत व्यवस्थित माहिती उपलब्ध होत नसल्याबद्दल सकाळने वेळोवेळी विषय लावून धरला होता. त्याची दखल घेत आज उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती नगरपालिकेत मध्यवर्ती सुविधा केंद्र सुरु करण्याची घोषणा केली. 

बारामतीकरांसाठी महत्त्वाची बातमी : कोरोनासंदर्भातील हेल्पलाईन अखेर झाली सुरु

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : शहरातील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालये, बेड तसेच रुग्णवाहिकांबाबत व्यवस्थित माहिती उपलब्ध होत नसल्याबद्दल "सकाळ'ने वेळोवेळी विषय लावून धरला. त्याची दखल घेत मंगळवारी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती नगरपालिकेत मध्यवर्ती सुविधा केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्ण आणि त्याचे नातेवाइक सैरभैर होतात. कोणत्या दवाखान्यात जागा उपलब्ध आहेत, कोठे उपचार मिळतील, कोठे ऑक्‍सिजन किंवा व्हेंटिलेटरची सुविधा असलेले बेड उपलब्ध आहेत, रुग्णवाहिकेची गरज भासल्यास कोणाला फोन करायचा, यासह इतरही अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते. या बाबत "सकाळ'ने वेळोवेळी आवाज उठवून ही सुविधा निर्माण होण्यासाठी पाठपुरावा केला. 

ऑनलाइन शाळेसाठी पालक आग्रही; मात्र शाळांचा नकार

याची दखल घेत प्रशासनाने मंगळवारी केंद्र सुरू केले. रुग्णांकडून जादा बिल आकारणे, औषधांचा पुरवठा, औषध व इंजेक्‍शन वेळेत व माफक दरात रुग्णांना उपलब्ध करून देणे, यावर तत्काळ नियंत्रण आणण्यासाठी बारामती तालुका मध्यवर्ती सुविधा केंद्र नगरपालिकेत सुरू केले. 

कोरोनामुळे सहायक पोलिस निरीक्षकाचा मृत्यू

येथे साधा संपर्क 
सुविधा केंद्रामध्ये बेड व्यवस्थापन, अत्यावस्थ रुग्ण व्यवस्थापन, रुग्णवाहिका व्यवस्थापन, औषध व ऑक्‍सिजन व्यवस्थापन, बिल तपासणी असे कक्ष स्थापन केले आहेत. 
या कक्षांचे प्रमुख व त्यांचे संपर्क क्रमांक ः 
बेड व्यवस्थापन कक्ष ः गणेश कराड (उपअधिक्षक, भूमीअभिलेख) 9767422975 
अत्यवस्थ रुग्ण व्यवस्थापन कक्ष ः भानुदास साळवे (सहायक गट विकास अधिकरी, पंचायत समिती) 9850930692 
वरील दोन्ही कक्षांचा संपर्क क्रमांक ः 7768808715 
रुग्णवाहिका व्यवस्थापन कक्ष ः दत्तात्रय पडवळ (तालुका कृषि अधिकारी) 9767215274 
औषध व ऑक्‍सिजन व्यवस्थापन कक्ष ः विजय नांगरे (अन्न व औषध प्रशासन) 7387561343 
वरील दोन्ही कक्षांचा संपर्क क्रमांक ः 7768808716 
बिल तपासणी कक्ष ः धनंजय गाडे (लेखा परिक्षक वर्ग-2 सहकारी संस्था) 9175939664 
कक्ष संपर्क क्रमांक ः 7768808717 
 

 

ज्या कोरोना रुग्णास बेड, रुग्णवाहिका, औषध, ऑक्‍सिजन, तसेच बिलाबाबत माहिती हवी असेल, मदत हवी असेल किंवा काही तक्रार असेल, तर सुविधा केंद्रातील कक्ष प्रमुखांशी संपर्क साधावा. 
दादासाहेब कांबळे, उपविभागीय अधिकारी