पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60 टक्क्यांवर

Corona infected patients have a cure rate of 60 percent
Corona infected patients have a cure rate of 60 percent

पुणे : पुणे विभागात 19 हजार 652 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या 32 हजार 886 झाली असून, उपचारानंतर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 59.76 टक्के इतके आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये सध्या 12 हजार 45 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विभागात कोरोना बाधित 1 हजार 189 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 617 रुग्ण गंभीर आहेत. मृत्यूचे प्रमाण 3.62 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

बुधवार पेठेतल्या 'त्या' गल्ल्या पडल्या ओस पण, 'त्यांना' पुण्यात परत यायचे... 

पुणे जिल्ह्यात 27 हजार 280 बाधित रुग्ण असून, 16 हजार 156 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टीव्ह रुग्ण संख्या 10  हजार 296 इतकी असून 828 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात बरे  होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 59.22 टक्के आहे. तर, मृत्यूचे प्रमाण 3.04 टक्के इतके आहे.

होय, मला कोरोना झालाय. तुमच्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच बरा होईल! 

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित एक हजार 251 रुग्ण असून, 779 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  अॅक्टीव्ह रुग्ण संख्या 422 असून 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 3 हजार रुग्ण असून, 1 हजार 735 बाधित रुग्ण बरे झाले आहेत. अॅक्टीव्ह रुग्ण संख्या 979 असून, 287 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 450 रुग्ण असून, 257 बाधित रुग्ण बरे झाले आहेत. अॅक्टीव्ह रुग्ण संख्या 181 असून, 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 904 रुग्ण असून, 725 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टीव्ह रुग्ण संख्या 167 असून, 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पुणेकरांनो ही चूक करु नका, नाहीतर... धडा शिकविण्याची प्रशासनाची भूमिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com