esakal | दौंड तालुक्यात १७ जणांना कोरोनाची बाधा
sakal

बोलून बातमी शोधा

jpg

दौंड तालुक्यातील १०७ जणांचे स्वॅब पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी ९० जण निगेटिव्ह तर १७ जणांचे अहवाल पॅाझिटिव्ह आले आहेत.

दौंड तालुक्यात १७ जणांना कोरोनाची बाधा

sakal_logo
By
प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यातील १०७ जणांचे स्वॅब पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी ९० जण निगेटिव्ह तर १७ जणांचे अहवाल पॅाझिटिव्ह आले आहेत. दौंड तालुक्यातील बाधितांची संख्या पावणेआठशेच्या पार गेली आहे. 

छोट्या आकाराचा सुखकर्ता ठरले मोठ्या आकाराचा विघ्नहर्ता

दौंड उप जिल्हा रूग्णालयाकडून ३३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी १९ ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालानुसार ३१ जणांचा अहवाल निगेटिव्ह तर ०२ जणांचा पॅाझिटव्ह आला आहे. २० व ४५ वय असलेल्या शहरातील भवानीनगर आणि शेंडे वस्ती येथील दोन जणांना बाधा झाली आहे, अशी माहिती उप जिल्हा रूग्णालय अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली.

तालुक्याच्या ग्रामीण भागातून ७४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २० ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालानुसार वाळकी मधील ५, खडकी ३, यवत २, पाटस २, लडकतवाडी १, चौफुला १ आणि देऊळगाव गाडा १, असे एकूण १५  जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. १७ ते ६० वयोमान असलेल्या या बाधितांमध्ये ०३ महिलांचा समावेश आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॅा. अशोक रासगे यांनी दिली. 

खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला

६०५ जण उपचारानंतर बरे- तालुक्यात २९ एप्रिल ते १९ ऑगस्ट या कालावधीत तब्बल ७६६ बाधितांपैकी ६०५ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील ३९४, दौंड शहरातील २९४ व एसआरपीएफ आणि इंडियन रिझर्व्ह बटालियनच्या (आयआरबी) ७८ पोलिसांचा समावेश आहे. त्यापैकी उपचारानंतर एकूण ६०५ जण बरे झाले आहेत. शहरातील १६ व ग्रामीण भागातील १२, असे एकूण २८नागरिकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यात सक्रिय बाधितांची संख्या १२३ इतकी आहे. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

loading image
go to top