esakal | मुळशीकरांनो, आतातरी काळजी घ्या; प्रशासनाचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

tu.jpg

मुळशी तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता साडेनऊशेचा आकडा पार केला. आज तालुक्यात नवीन २० रुग्ण सापडले आहेत.

मुळशीकरांनो, आतातरी काळजी घ्या; प्रशासनाचे आवाहन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिरंगुट : मुळशी तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता साडेनऊशेचा आकडा पार केला. आज तालुक्यात नवीन २० रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आता ९५३ झाली आहे. आता काळजी घ्यायला हवी असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केला आहे. 

खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला

दरम्यान, तालुक्यात आज सूस येथे १, पिरंगुट २,  भूगाव २, पौड १, नेरे २, हिंजवडी ६, मुलखेड १, घोटावडे ४ तर मुठा येथे १ रुग्ण सापडला आहे. आज बरे होऊन घरी सोडलेल्यांमध्ये १८ रुग्णांचा समावेश आहे.

त्यामुळे तालुक्यात बरे होऊन घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या आता ७५६ झाली आहे. आज कोरोनामुळे भूगाव येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

छोट्या आकाराचा सुखकर्ता ठरले मोठ्या आकाराचा विघ्नहर्ता

दरम्यान, त्यामुळे आजअखेर  तालुक्यातील मृतांची संख्या २९ वर 
पोचली आहे. सध्या रुग्णालयात १६८ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांपैकी १ रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत असून, अतिदक्षता विभागात ६ रुग्ण उपचार घेत आहेत.

(Edited by : Sagar Diliprao Shelar) 

loading image
go to top