esakal | कोरोनानंतर हवा व्यायाम अन् संतुलित आहार
sakal

बोलून बातमी शोधा

Exercise

कोरोनानंतर हवा व्यायाम अन् संतुलित आहार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोना (Corona) होऊन गेल्यानंतर जीवन जगताना नियमित व्यायाम (Exercise) आवश्यक (Important) आहेच, त्याबरोबरच नेमका संतुलित आहार (Balanced Diet) गरजेचा आहे. त्यातूनच प्रतिकारशक्ती सुदृढ होऊ शकते. आहारात पालेभाज्यांबरोबरच फळांचेही प्रमाण वाढविण्याची गरज आहारतज्ज्ञांनी व्यक्त केली. (Corona is Followed by Exercise and a Balanced Diet)

कोरोना होण्यापूर्वी आणि नंतरही काही काळ रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, थकवा जाणवतो, भूक लागण्याचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे मानसिक आरोग्यावरही त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यासाठी रोजच्या आहारात सोयाबिन, मसूर, डाळ, पनीर, शेंगदाणे हे उत्तम प्रथिने मिळण्याचा स्रोत आहे. दैनंदिन आहारातून प्रथिने, लोह यांची शरीराला आवश्यकता असते. त्यासाठी सकस आहार आवश्यक आहे. प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते. त्यामुळे डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांशी चर्चा करूनच आपला रोजचा आहार निश्चित करावा. तसेच व्यायामाबाबतही आहे. आपल्याला झेपेल इतकाच व्यायाम तज्ज्ञांच्या सल्ल्याने करण्याची गरज आहे. मांसाहारी आहार घेणाऱ्यांनी मासे, चिकण, मटण आणि अंडी यांचे प्रमाण मर्यादित ठेवले पाहिजे.

हेही वाचा: ...म्हणून रविंद्र बऱ्हाटेने घेतली नाही कोरोना प्रतिबंधक लस !

आहारतज्ज्ञ मनीष चौधरी म्हणाले, ‘‘निरोगी आयुष्य जगण्यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप, व्यायाम, योग्य मानसिक संतुलन याचा ताळमेळ असणे आवश्यक आहे. दिवसातून किमान ३- ४ लिटर पाणी पिण्याची गरज आहे. तसेच, सकाळी किंवा रात्री दहा मिनिटे ध्यान केले पाहिजे. रात्रीची झोप किमान ८ ते ९ तास झाली पाहिजे.’’

अशी असावी दिनचर्या...

  • सकाळी ८ वाजता - उपाशीपोटी लिंबू, एक चमचा मध आणि पाणी मिसळून प्यावे.

  • न्याहारी सकाळी ९ वाजता - पोहे, उपमा किंवा ओट्‌्स, एखादे फळ, कमी साखर घातलेला एक कप चहा

  • दुपारी १ वाजता - मिश्र डाळींची खिचडी, नारळाचे पाणी

  • दुपारी ४ वाजता - कमी साखर घातलेला एक कप चहा, सफरचंद किंवा संत्रे, मूठभर बदाम/शेंगदाणे/काजू

  • रात्रीचे जेवण ८ वाजता - दोन चपाती/ भात + कोणतीही एक भाजी/ एक वाटी डाळ + एक मध्यम वाटी कोशिंबीर, चार खजूर

  • रात्री ९ वाजता - एक ग्लास कोमट दूध, अर्धा चमचा हळद, एक चमचा मध, तीन कुस्करलेले बदाम

कोरोनानंतर मी खाण्याचे वेळापत्रक निश्चित केले. त्यामुळे सकारात्मक बदल झाला. माझा अशक्तपणा दूर झाला आणि जगण्यात आत्मविश्वास आला.

- किरण परमार (बरा झालेला कोरोनारुग्ण)

loading image