
पुणे विभागात आजअखेर 17 लाख 46 हजार 425 नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी तीन लाख 96 हजार 714 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
पुणे विभागात चार लाखाहून अधिक कोरोनाच्या विळख्यात; पाहा आकडे काय सांगतात
पुणे : पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या तीन लाख 96 हजार 714 झाली असून, त्यापैकी तीन लाख 8 हजार 789 रुग्ण बरे झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 77 हजार 526 इतकी आहे. 24 सप्टेंबरअखेर कोरोना बाधित दहा हजार 399 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के आहे. तसेच, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 77.84 टक्के असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
- पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी विजय देशमुख यांची नियुक्ती
पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दोन लाख 61 हजार 683 इतकी आहे. त्यापैकी दोन लाख 13 हजार 598 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 42 हजार 242 आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित पाच हजार 843 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचे प्रमाण 2.23 टक्के आहे. तसेच, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 81.62 टक्के इतके आहे. पुणे विभागात आजअखेर 17 लाख 46 हजार 425 नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी तीन लाख 96 हजार 714 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
- IPL 2020 : 'राहुल, नाम तो सुना ही होगा'; यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक
सातारा जिल्हा :
एकूण रुग्ण : 32 हजार 222
बरे झालेले रुग्ण : 22 हजार 212
उपचार घेत असलेले रुग्ण : 9 हजार 40
मृत्यू : 970
सोलापूर जिल्हा :
एकूण रुग्ण : 30 हजार 230
बरे झालेले रुग्ण : 21 हजार 206
उपचार घेत असलेले रुग्ण : 7 हजार 943
मृत्यू : 1 हजार 81
सांगली जिल्हा :
एकूण रुग्ण : 31 हजार 540
बरे झालेले रुग्ण : 21 हजार 501
उपचार घेत असलेले रुग्ण : 8 हजार 856
मृत्यू : 1 हजार 183
कोल्हापूर जिल्हा :
एकूण रुग्ण : 41 हजार 39
बरे झालेले रुग्ण : 30 हजार 272
उपचार घेत असलेले रुग्ण : 9 हजार 445
मृत्यू : 1 हजार 322
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
Web Title: Corona Killed More Ten Thousand People Pune Division
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..