कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या पंखांना बळ

कोरोनाकाळात आई-वडील यांचा मृत्यू झाल्याने अनेक कुटुंबातील मुले अनाथ झाली. काही जणांच्या डोक्यावरून आई किंवा वडिलांचे छत्र उडाले.
Patients and Relatives
Patients and RelativesSakal

पुणे - कोरोनाकाळात (Corona) आई-वडील यांचा मृत्यू (Death) झाल्याने अनेक कुटुंबातील मुले अनाथ (Orphan) झाली. काही जणांच्या डोक्यावरून आई किंवा वडिलांचे छत्र उडाले. राज्यातील अशा अनाथ मुलांच्या मदतीला (Help) काही स्वयंसेवी संस्था (Social Organization) धावल्या आहेत. औरंगाबाद येथील श्री साई ग्रामीण पुनर्रचना संस्था संचलित डॉ. हेडगेवार मेमोरिअल पब्लिक स्कूल, भारतीय जैन संघटनेच्यावतीने अशा मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. (Corona Orphan Child Help Social Organization)

डॉ. हेडगेवार शाळेचा पुढाकार

औरंगाबाद - कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले. काहींचे आई-वडिलांचे छत्रच हरपले. अशा अनाथ झालेल्या राज्यभरातील मुला-मुलींना श्री साई ग्रामीण पुनर्रचना संस्था संचलित डॉ. हेडगेवार मेमोरियल पब्लिक स्कूल मोफत प्रवेश देणार असून या मुला-मुलींचे राहणे, जेवणासह सर्व प्रकारचा शैक्षणिक खर्च संस्थेकडून केला जाणार आहे.ज्या मुलांचे आई किंवा वडील यापैकी एकाचे जरी कोरोनामुळे निधन झाले असेल अशा पाल्यांनाही येथे प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये देश आणि राज्यभरातील मुले-मुलींसाठी प्रवेश घेऊ शकतात.

Patients and Relatives
कोरोना सर्वेक्षण, लसीकरणाला खीळ; ३ हजार आशा स्वयंसेविका बेमुदत संपावर

‘बीजेएस’ देणार ७०० विद्यार्थ्यांना शिक्षण

अकोला - कोरोनामुळे अनाथ झालेले विद्यार्थी प्रचंड तणावाखाली जीवन जगत आहते. त्यांना शिक्षणाबरोबरच मानसिक तणावातून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणणे, आत्मविश्वास वाढविणे, मोठी स्वप्न दाखविणे व ती साकारण्यासाठी सक्षम करणे हे एक मोठे आव्हान आहे. भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) राज्यातील अशा ७०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

‘बीजेएस’ने लातूरमधील बाराशे भूकंपग्रस्त विद्यार्थी, मेळघाट व ठाण्यातील अकराशे आदिवासी विद्यार्थी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे सातशे विद्यार्थी असे मागील ३० वर्षांत एकूण तीन हजार विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढून त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन केले आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना भेटून पाचवी ते बारावीपर्यंत मराठी माध्यमामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांची यादी घेणार आहेत. त्यांना पुणे येथे शिक्षणासाठी पाठविण्यासाठी पालकांची संमती घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणार आहेत.

Patients and Relatives
पुण्यात वेगवेगळ्या भागात कालव्यात मंगळवारी आढळले तीन मृतदेह

पुण्यातील शाळेत देणार प्रवेश

बीजेएसच्या वाघोली, पुणे येथील शैक्षणिक संकुलातील मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्याच संकुलात विद्यार्थ्याना वसतिगृह, नाश्ता, भोजन आदी सोयी मिळतील.

आता जी मुले कोरोनामुळे अनाथ झाली आहेत, अशांनी प्रवेशासाठी आमच्याशी संपर्क करावा. कागदपत्रांची कोणतीही अडचण आमच्या संस्थेत नाही. त्यामुळे कोरोनामुळे अनाथ झालेल्या राज्यभरातील मुले-मुलींनी प्रवेशासाठी आमच्याकडे संपर्क करावा.

- श्‍यामसुंदर पंडितराव कनके, संस्थाध्यक्ष

रुग्ण व नातेवाइकांना डबे

रत्नागिरी - एप्रिल आणि मे महिन्यामध्ये रत्नागिरीमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि टाळेबंदी तसेच गृह विलगीकरणामध्ये असणाऱ्या व्यक्तींना जेवण मिळणे कठीण झाले. समाजातील ही गरज ओळखून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने एक महिन्यात तीन हजारांहून अधिक डबे पोचवले.

टाळेबंदीमुळे कोरोना रुग्णालयांत रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक यांच्या जेवणाचे हाल होते. सौम्य लक्षणे असणारे काही रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. त्यामुळे त्यांनाही नि:शुल्क डबा पोचविण्याचे कार्य विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते करत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com