esakal | कोरोनाच्या सावटातही आल्या आल्या सोनपावलांनी गौराई
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या सावटातही आल्या आल्या सोनपावलांनी गोराई

कोरोनाच्या सावटातही आल्या आल्या सोनपावलांनी गौराई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट : भाद्रपद चतुर्थीला लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन रविवारी (दि. १२ सप्टेंबर २०२१) झाले की, सर्व जण अगदी आतुरतेने गौराईच्या आगमनाची वाट पाहतात. आली आली गौराई... म्हणत गौराईचे घरामध्ये आगमन झाल्यानंतर हळदीच्या ठशांनी चंदनाचे बोट लावलेल्या पावलांचे ठसे घरभर उमटवले. त्यानंतर घरोघरी पारंपारिक पद्धतीने पूजा करून नैवेद्य दाखवण्यात आला.

शहर-उपनगरामध्ये मानाच्या आणि पारंपरिक, तर काहीजण उभ्या, बैठ्या पद्धतीने गौराई बसवितात. महाराष्ट्रामध्ये गौरी आगमन ते विसर्जन हा तीन दिवसाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या सावटाने आनंदावर विरजण पडले आहे. भाविकांनी सोशल डिस्टनसिंग व इतर नियमांचे पालन करून घरी गौरी आणल्या आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात गौरी आवाहन आणि मांडण्याच्या पद्धतींमध्ये वैविध्य आढळून येते. प्रत्येक जण आपापल्या परंपरा, पद्धती, कुळाचार यांना अनुसरून प्रतिवर्षी गौरी पूजन करतात.

हेही वाचा: "CM नहीं PM बदलो! मुख्यमंत्री बदलण्याने मोदींचं अपयश झाकणार नाही"

महालक्ष्मीचे आगमन हा महिलांचा आवडता सोहळा असतो. घराची स्वच्छता करण्यापासून ते त्यांच्यासाठी वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांची मेजवानी आणि रेखीव, कलाकुसरीच्या दागिन्यांची भेट देऊन महिला महालक्ष्मींचे स्वागत करतात. शेवटच्या क्षणापर्यंत महिलांचे सजावटीचे काम सुरू असते. नोकरदार स्त्रिया रात्री जागून जय्यत तयारी करतात. यंदाही घराघरांत महालक्ष्मींच्या स्वागतासाठी नावीन्यपूर्ण साहित्याची सजावट करण्यात आली आहे.

हेही वाचा: योगींच्या जाहिरातीत कोलकत्याचा उड्डाणपुल; तृणमूलचा आक्षेप

मागील वर्षीप्रमाणेच कोरोनाच्या सावटामुळे सजावट साहित्य व मुखवटे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली नव्हती. तरीही बाजारात विविध पद्धतीने सजवलेले गौरींचे विविध प्रकारचे मुखवटे बाजारात उपलब्ध होते. त्यासोबतच मंगळसूत्र, बांगड्या, नथ, मोत्याच्या माळा, जोडवी अशा पारंपरिक दानिन्यांसह विविध दागिन्यांची खरेदी करण्यास काहीशी पसंती मिळत आहे.

loading image
go to top