पुणे जिल्ह्यातील या भाजप नेत्याच्या घरात कोरोनाचा शिरकाव 

राजेंद्र सांडभोर
Tuesday, 4 August 2020

खेड तालुक्यात गेल्या चोवीस तासात ४४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून, कोरोना रुग्णांची एकूण संख्या १५३८ वर गेली आहे, तर एक ज्येष्ठ कोरोनाबधित दगावले आहेत,

राजगुरूनगर (पुणे) : खेड तालुक्यात गेल्या चोवीस तासात ४४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून, कोरोना रुग्णांची एकूण संख्या १५३८ वर गेली आहे, तर एक ज्येष्ठ कोरोनाबधित दगावले आहेत, अशी माहिती डॉ. बी. बी. गाढवे यांनी दिली. दरम्यान, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरद बुट्टे पाटील यांच्या घरातील चार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

शरद पवार पुन्हा ठरले चाणक्य

आज आळंदी येथील ७२ वर्ष वयाचा ज्येष्ठ रुग्ण यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू असताना दगावला. आज चाकणला ७, राजगुरूनगरला ४ आणि आळंदीत १२ कोरोनाबधित रूग्ण आढळले. तर, वराळे येथे ४, आंबेठाणला ३, मोई येथे ३, मेदनकरवाडी आणि सांडभोरवाडीत प्रत्येकी २ रुग्ण आढळले. बुट्टेवाडी, भांबुरेवाडी, येलवाडी, महाळुंगे, चिंबळी, खालुंब्रे, कडूस या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.

राष्ट्रवादीच्या आमदाराकडून सरकारला घरचा आहेर... 

वराळे येथील चारही रूग्ण जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरद बुट्टे पाटील यांच्या घरातील आहेत. त्यांची आई, भाऊ, पुतण्या आणि पुतणी यांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, स्वतः बुट्टे पाटील आणि त्यांच्या मुलीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पण, ते कुटुंबियांच्या सततच्या संपर्कात राहिल्याने होम क्वारंटाइन झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient at BJP leader Sharad Butte Patil's house