Corona Patient Count increase in India and Stable in Pune
Corona Patient Count increase in India and Stable in Pune

Corona Updates : देशात रुग्णांच्या संख्येत वाढ; पुण्यात नवीन रुग्ण नाही

पुणे : पुण्यात आढळेल्या १० कोरोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर त्या रुग्णांना आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान कोरोनाग्रस्तांची संख्या देशात ७२ वर पोहचली असून महाराष्ट्रात २० वर पोहचली आहे. पुण्यात आज कोरोनाचा कोणाताही नवीन  रुग्ण नाही. नागपूर आणि मुंबईत आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसकर यांना आज पत्रकार परिषदेत दिली आहे.  

गेल्या 24 तासात एनआयव्हीला 23 संशयित रुग्णांचे नमुने तपसाणीसाठी पाठविले होते. त्यांचे कोरोना टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाची लागण झालेले पुण्यात 10,  मुंबईत 4 , नागपूरमध्ये  4, ठाण्यात 1 तर नगरमध्ये 1 असे एकून 20 रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. तसेच परदेशातून आलेल्या सर्वांची तपासणीकरण्यात आली असून परदेशातून पुण्यात येणाऱ्यांवर देखरेख केली जाणार आहे. बाहेरुन आलेल्या संशयित रुग्णांनी 14 दिवस घरीच राहण्याचे आवाहन डॉ. म्हैसकर यांनी केले आहे. 

शरद पवारांच्या शब्दाचं वजन पाहा; एका पत्रावर 'या' नेत्याची नजरकैदेतून सुटका
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोठी घोषणा केली. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर काल रात्रीपासूनच पुणे, मुंबई , नवी मुंबई, नागपूर, पिंपरी चिंचवडमध्ये जिम, सिनेमा हॉल, जलतरण केंद्र, मॉल्स पुढची सूचना येईपर्यंत बंद राहणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होईल असे  डॉ. म्हैसकर यांनी  सांगितले.  केंद्रशासनाकडून मिळालेल्या सुचनांनुसार वेळोवेळी कार्यवाही केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासना कडक पावले उचलणार असून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

काम असेल तरच ऑफिसला या; राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त पुण्यात!

वसतिगृह सुरु ठेवण्याचा निर्णय विद्यापिठाचा असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच विद्यापिठात विद्यार्थ्यांनी अनावश्यक फिरु नये. कोणत्याही परिस्थितीत शालेय व  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बाहेर फिरू नये. ज्यांच्या परिक्षा नाही, ज्यांना सुट्टया मिळालेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांनी बाहेर फिरु नये, घरातच राहावे. तसेच 10 वी 12 वीच्या परिक्षेत कोणताही बदल नाही, असेही त्यांनी सांगतिले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com