esakal | बारामतीच्या या गावातही कोरोनाची अखेर एन्ट्री
sakal

बोलून बातमी शोधा

corona

या रुग्णाच्या निमित्ताने परिसरात प्रथमच कोरनाची एन्ट्री झाली आहे. गेले चार महिने लोकांनी काटेकोर काळजी घेतल्याने परिसर कोरोनामुक्त होता. परिसरात व्यापारी पेठा असल्याने आता मात्र आणखी काळजी घ्यावी लागणार आहे.

बारामतीच्या या गावातही कोरोनाची अखेर एन्ट्री

sakal_logo
By
संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर (पुणे) : बारामती तालुक्यातील मुरुम येथील एक मध्यमवयीन गृहस्थ आज कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते पुणे येथे उपचार घेत आहेत. यानिमित्ताने येथील परिसरात कोरोनाची एन्ट्री झाली आहे.

कोरोनामुळे अनेक व्यवसाय अडचणीत, पण हा व्यवसाय तेजीत

मुरूम येथील एक व्यक्ती पुणे येथे राहत होती. 26 जूनला ते उसाची लागवड करण्यासाठी मुरूम या आपल्या गावी आले होते. लागवडीनंतर पुन्हा तीस तारखेला पुण्याला गेले होते. पुण्यात गेल्यावर त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवली. त्यामुळे त्यांनी तपासणी करून घेतली. आज ते कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. चार दिवस मुरूम परिसरात राहून गेल्याने व ऊस लागवड करून घेतल्याने त्यांच्या संपर्कात कोण कोण आले आहे, याची तालुका आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू आहे. 

कोरोनामुक्त रुग्ण घरी परतल्यावर स्वागत करताय तर... 

या रुग्णाच्या निमित्ताने परिसरात प्रथमच कोरनाची एन्ट्री झाली आहे. गेले चार महिने लोकांनी काटेकोर काळजी घेतल्याने परिसर कोरोनामुक्त होता.  परिसरात करंजेपूल, वानेवाडी या व्यापारी पेठा असल्याने आता मात्र आणखी काळजी घ्यावी लागणार आहे. 

मराठमोळ्या रीवाचा जागतिक गौरव

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले की, सदर व्यक्ती पुण्यातलाच रुग्ण म्हणून गृहीत धरण्यात आला आहे. रुग्णाची पत्नी निगेटिव्ह निघाली आहे. मुरुमला चार दिवस असल्याने त्यांच्या घरातील दोन व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. संपर्कातील अन्य लोकांचीही माहिती घेतली जात आहे. रुग्ण पुण्यात गेल्यावर पॉझिटिव्ह आल्याने येथील लोकांनी घाबरून जाऊ नये, मात्र काळजी घ्यावी.