होम क्वॉरंटाईन असलेल्या कोरोना रुग्णाने केली आत्महत्या; सहकारनगरमध्ये घडली घटना

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी अजय यांना देखील कोरोना झाला.

पुणे : कोरोनामुळे घरात क्वॉरंटाईन असलेल्या एकाने नैराश्‍याच्या गर्तेत गळफास घेऊन आत्महत्या केली. सहकारनगर भागात ही घटना घडली असून आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी कोरोनाने निधन झाले आहे. आत्महत्या केलेली 45 वर्षीय व्यक्ती सहकारनगरमधील एका सोसायटीत राहायला आहे.

जम्बो हॉस्पिटलची जबाबदारी सांभाळणार 'हे' चार डॉक्‍टर!​ 

पोलिसांच्या माहितीनुसार, अजय (नाव बदललेले) हे गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबीयांसोबत सहकारनगर परिसरात राहात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी अजय यांना देखील कोरोना झाला. उपचार घेतल्यानंतर डॉक्‍टरांनी त्यांना होम क्वॉरंटाइन होण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अजय हे एकटेच घरी राहत होते. तर पत्नी आणि दोन मुलांना सासरी पाठविले होते.

'मित्र आणि वायसीएमच ठरले देवदूत'; कोरोनातून बरे झालेल्या उद्योजकाने भावना केली व्यक्त​

मंगळवारी अजय यांचे बंधू त्यांना नाष्टा घेऊन घरी गेले होते. त्यावेळी त्यांना अजय यांनी गळफास घेतल्याचे दिसले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी अजय यांना मृत घोषित केले. नैराश्‍यातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेचा तपास सहकारनगर पोलिस करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient who was quarantined at home committed suicide in a depression