पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या 5 हजाराच्या उंबरठ्यावर'; पुढील 15 दिवसांमध्ये होणार दुप्पट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

पुण्यात चार हजार 993 रुग्णसंख्या असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्याच्या संकेतस्थळावर शनिवारी दुपारी साडेतीन वाजता अपडेट करण्यात आली. त्यामुळे गेल्या 75 दिवसांमध्ये शहरातील कोरोनाबाधीतींची संख्या पाच हजार झाल्याचे स्पष्ट झाले. राज्यातील मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहे.

पुणे : पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाच हजाराच्या उंबरठ्यावर पोचली असून, पुढील पंधरा दिवसांमध्ये ही संख्या दहा हजाराचा टप्पा ओलांडेल. त्या दृष्टीने महापालिका आणि जिल्हा प्रशासनाची यंत्रणा कार्यरत झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात चार हजार 993 रुग्णसंख्या असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्याच्या संकेतस्थळावर शनिवारी दुपारी साडेतीन वाजता अपडेट करण्यात आली. त्यामुळे गेल्या 75 दिवसांमध्ये शहरातील कोरोनाबाधितींची संख्या पाच हजार झाल्याचे स्पष्ट झाले. राज्यातील मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहे. राज्यात आतापर्यत 44 हजार 582 रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 61 टक्के (27 हजार 251) रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. तर, पुण्यात ही संख्या 4993 (11 टक्के) असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे जिल्ह्याने म्हणजे पुणे शहर, पिंपरी चिंचवड महापालिका आणि ग्रामीण भाग मिळून शुक्रवारी पाच हजार 167 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ. भगवान पवार यांनी दिली. 

 बारामतीतील माळेगाव कारखान्याच्या टाकीत आठ जण गुदमरले

पुण्यात सध्या 15 दिवसांचा डबलिंग रेट आहे. म्हणजे सध्या असलेल्या रुग्णांची संख्या पुढील 15 दिवसांमध्ये दुप्पट होते. या दुप्पट होण्याचा दराचा विचार करता पुण्यात पुढील पंधरा दिवसांमध्ये रुग्णसंख्या दहा हजारांचा टप्पा गाठेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यात सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात असतील. त्यामुळे नव्याने आढळणाऱया कोरोनाबाधीत रुग्णांठी उपचारांची सुविधा निर्माण करण्यावर प्रशासनकीय यंत्रणेने भर दिला आहे. रुग्णाचे लवकर निदान करून त्याला तातडीने उपचाराखाली आणण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे अत्यवस्थ होणाऱया रुग्णांचे प्रमाण कमी होईल. त्यातून अतीदक्षाता विभागात जाणाऱया रुग्णांची संख्या नियंत्रित करता येईल. आणि पर्यायाने मृत्यूदर कमी ठेवण्यास मदत होईल, असा विश्सास महापालिकेतील आरोग्य अधिकाऱयांनी व्यक्त केला. 
वीज ग्राहकांनो,आता घरबसल्या मांडा तक्रारी; महावितरणाने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patients will double in the next fortnight at pune