कोरोनात वंचितांचे शिक्षणही ‘खुंटले’

जेझ हॅन्ड फाउंडेशनने महापालिका क्षेत्रातील पाचवी ते आठवीच्या २२८ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले आहे.
Deprived family children
Deprived family childrensakal
Summary

जेझ हॅन्ड फाउंडेशनने महापालिका क्षेत्रातील पाचवी ते आठवीच्या २२८ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले आहे.

पुणे - लॉकडाउनकाळात पुण्यातील सर्वसामान्य अथवा वंचित कुटुंबातील विद्यार्थी केवळ घरात अडकून पडले नाही. तर त्यांचे शिक्षण, पोषण, आरोग्य आणि विकासही खुंटल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

जेझ हॅन्ड फाउंडेशनने महापालिका क्षेत्रातील पाचवी ते आठवीच्या २२८ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले आहे. यात वंचित कुटुंबातील फक्त २७ टक्के विद्यार्थ्यांकडे अभ्यासासाठी स्मार्टफोन उपलब्ध होता. उर्वरित विद्यार्थ्यांनी पुस्तकांच्या आधारे अभ्यास केला. म्हणजे ७३ टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे सर्वेक्षणात सहभागी ५३.२७ टक्के विद्यार्थ्यांची अन्न सुरक्षा लॉकडाउन काळात धोक्यात आल्याचे पुढे आले आहे. फाउंडेशनच्या अनन्या नायर आणि अनन्या निपाणे यांनी अग्रीमा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन केले. एसएसआरएन या प्रकाशनपूर्व शोधपत्रिकेत हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.

संशोधनाची पद्धत

  • मासिक उत्पन्न २० हजारांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील २२८ विद्यार्थ्यांची निवड

  • सलग ९० दिवस घरी अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी ७३ प्रश्न

  • पालक - विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांच्या आधारे निष्कर्ष

महत्त्वाचे तथ्ये

  • स्मार्ट फोनच्या अनुपलब्धतेमुळे विद्यार्थ्यांनी पुस्तकातून अभ्यास केला

  • मोठ्या भावंडांच्या किंवा ओळखीतल्या मित्रांची जुनी पुस्तके अभ्यासासाठी वापरली

  • ७६ टक्के विद्यार्थ्यांचा शिक्षकांशी संपर्क होता

  • २२८ पैकी फक्त १४१ विद्यार्थी मुळ पुणेकर

  • मुलांच्या शिक्षणावरील मासिक खर्च एक ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान

निष्कर्ष

  • ७० टक्क्यांपेक्षा अधिक वंचित विद्यार्थ्यांचे शिक्षण खुंटले

  • बहुतांश विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके खरेदी करता आली नाही

  • स्मार्टफोन अभावी बोलो, दिक्षा, शिक्षा आणि अभ्यासमित्र अशा शैक्षणिक ॲपपासून विद्यार्थी वंचित

  • ५६ टक्के विद्यार्थ्यांच्या घरात एकच स्मार्टफोन

  • बहुतेक विद्यार्थ्यांना अभ्याससासंबंधी कोणतेच निर्देश नाही, फार तर व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून माहिती मिळाली

  • अल्पउत्पन्न गटातील ७० टक्के पालकांच्या नोकऱ्या गेल्या

शहरी भागातील मुठभर इंग्रजी शाळांचे अनुकरण करत ऑनलाइन शिक्षणाचा आग्रह धरला. त्याचा फटका आता बसल्याचे दिसत आहे. आता अशा विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक अध्यापनाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. प्रवाहातून बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी स्वतंत्र प्रयत्न करावे लागतील.

- हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com