दौंडमधील १११ पोलिसांचा कोरोना अहवाल आलाय असा...

प्रफुल्ल भंडारी
बुधवार, 20 मे 2020

मुंबई येथे बंदोबस्त पूर्ण करून आलेले आयआरबीच्या तुकडीतील १११ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते.

une-news">पुणे) : दौंड येथील इंडियन रिझर्व्ह बटालियनचे (आयआरबी) आणखी सहा पोलिसांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. मागील पाच दिवसांत आयआरबीच्या एकूण १५ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे.

लय भारी...शिवरीकरांच्या खड्या पहाऱ्याने कोरोना पळाला कोसो दूर... 

याबाबत दौंड उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी आज (ता. २०) माहिती दिली की, मुंबई येथे बंदोबस्त पूर्ण करून आलेले आयआरबीच्या तुकडीतील १११ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज आला असून, १११ पैकी ६ जणांना बाधा झाली आहे. बाधित पोलिस हे २५ ते ३५ वयोगटातील आहेत. बाधित रूग्णांना पुढील उपचारासाठी पुणे येथे रवाना करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आयआरबीचे मुख्यालय कोल्हापूर येथे असून, गट क्रमांक सोळा या नावाने ओळखले जाते. आयआरबीच्या काही तुकड्या दौंड शहरात राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रांगणात स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. मुंबई येथे बंदोबस्त करून परतलेल्या आयआरबीच्या एका तुकडीचे दौंड - पाटस रस्त्यावरील विद्यालयात, तर अन्य एका तुकडीचे दौंड शहराजवळील पासलकर वस्ती येथील शासकीय वसतिगृहात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. 

कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ट्विटला सुप्रिया सुळे यांच्याकडून... 

दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक पाचचे व गट क्रमांक सातचे मुंबई येथे बंदोबस्त करून परतलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचार्यांचे नानवीज (ता. दौंड) येथील राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. 

कोरोनावर २४ पोलिसांनीनी केली मात              दौंड तालुक्यात २९ एप्रिल रोजी पहिल्यांदा दहिटणे येथील सत्तर वर्षीय नागरिकास कोरोनाची बाधा झाली होती. त्यांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यात २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत दहिटणे येथील १ सत्तर वर्षीय नागरिक, एसआरपीएफ गट क्रमांक सातचे २७ अधिकारी व कर्मचारी, दूध विक्रेत्यासह कुटुंबातील एकूण ३ जण, आयआरबीचे १५ पोलिस, असे एकूण ४६ जणांना बाधा झाली आहे. त्यापैकी दहिटणे येथील १ नागरिक व एसआरपीएफचे २४ पोलिस, असे २५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यातील बाधितांची आजअखेर संख्या २१ आहे.           


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report of 111 policemen in Daund