इंदापूर तालुक्यातील या 12 जणांचा कोरोना अहवाल... 

राजकुमार थोरात
शुक्रवार, 3 जुलै 2020

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील जंक्शन व लाकडी येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कामध्ये आलेल्या १२ जणांचा अहवाल

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील जंक्शन व लाकडी येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कामध्ये आलेल्या १२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

कोरोनामुळे अनेक व्यवसाय अडचणीत, पण हा व्यवसाय तेजीत

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेळगाव व जंक्शनमधील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आठ जणांचा अहवाल गुरुवार (ता. २) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या भागातील नागरिक घाबरले होते. लाकडीमधील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १० नागरिकांचे व जंक्शनमधील संपर्कात आलेल्या २ महिलांच्या घशातील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आज सायंकाळी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.

कोरोनामुक्त रुग्ण घरी परतल्यावर स्वागत करताय तर... 

दरम्यान, जंक्शन, शेळगाव व लाकडी गावामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे लासुर्णे, जंक्शन, वालचंदनगर, आनंदनगर,
अंथुर्णे, शेळगाव, लाकडी या परिसरातील व्यवहार ठप्प झाले आहेत. नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य काळजी घेण्याचे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जीवन सरतापे यांनी केले आहे.

मराठमोळ्या रीवाचा जागतिक गौरव

अफवांवर विश्‍वास ठेवू नका...
कोरोना रुग्णाच्या संदर्भात इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. पश्‍चिम भागातील कोरोनाची लागण झालेल्या सर्व रुग्णांची प्रकृती चांगली असून, नागरिकांनी अफवावर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report of 12 persons from Indapur taluka is negative