esakal | धक्कादायक, बारामतीतील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोना 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

बारामती शहरात कोरोना रुग्णांची संख्या नियमित वाढताना आता कौटुंबिक संसर्गही वेगाने होऊ लागल्याचे समोर येत आहे. आज बारामती परिसरातील घेतलेल्या 46 नमुन्यांपैकी 10 जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. यात एकाच कुटुंबातील

धक्कादायक, बारामतीतील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोना 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती शहरात कोरोना रुग्णांची संख्या नियमित वाढताना आता कौटुंबिक संसर्गही वेगाने होऊ लागल्याचे समोर येत आहे. आज बारामती परिसरातील घेतलेल्या 46 नमुन्यांपैकी 10 जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. त्यामुळे आता नवीनच संकटाला बारामतीकरांना सामोरे जावे लागत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बारामतीतील कोरोनाबाधितांची संख्या आता 287 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. अत्यंत वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे हा वेग कमी करून मृतांचे प्रमाणही कमी करण्याकडे आता प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. आज सापडलेल्या बारा जणांपैकी पाच जण आमराई परिसरातील एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. आमराईशिवाय सहयोग सोसायटी, देसाई ईस्टेट व रामगल्लीतील, तर तालुक्यातील पाहुणेवाडी, जैनकवाडी, गुनवडी येथीलही रुग्णांचा समावेश आहे. 

देशाचा जलखजिना आता एकाच क्लिक वर

एकीकडे रुग्णांना योग्य वैद्यकीय सेवा व व्यवस्था मिळावी म्हणून प्रशासन रात्रंदिवस झटत असतानाच दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव व समूह संसर्ग होऊ नये, या साठीही आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. लोकांनी स्वयंशिस्त पाळल्यास कोरोनावर मात करणे सहज शक्य असल्याचे वैद्यकीय व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामती शहरातील गर्दीचे वाढते प्रमाण चिंताजनक असून, समूह संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वयंशिस्तीचे पालन करण्याची गरज आहे. जसजसे दिवस जाऊ लागले आहेत, तसे कोरोनाची भीती कमी होऊ लागली आहे. कोरोनाचे संकट दूर झाल्यासारखेच काही नागरिक वावरत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसते. प्रशासन आपल्या परिने सर्व प्रयत्न करीत आहे. मात्र, घराबाहेर पडण्याचे टाळण्यासह मास्कचा व सॅनेटायझर्सचा वापर या सारख्या बाबींचे कटाक्षाने पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पुण्यात डबेवाल्यांवरच आली उपासमारीची वेळ