पुणे : जिल्हा परिषद प्रशासनाकडूनच कोरोना नियमांची पायमल्ली

आरोग्य भरतीच्या निमित्ताने सुमारे पन्नास जणांना जिल्हा परिषदेत निमंत्रित केल्याचे उघड झाले आहे.
पुणे जिल्हा परिषद
पुणे जिल्हा परिषदsakal

पुणे : पुणे शहर व जिल्ह्यात वेगाने वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी कोरोनाबाबतचे निर्बंध कडक करण्यात आलेले असताना खुद्द पुणे जिल्हा परिषद प्रशासनानेच सोमवारी (ता.१७) उल्लंघन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी (ता. १७) एकाच दिवसात शिक्षक समायोजनेसंदर्भात म्हणणे मांडण्याच्या नावाखाली जिल्ह्यातील सुमारे पाचशेहून अधिक शिक्षकांना निमंत्रित केल्याचा आरोप उपस्थित शिक्षकांनी केला आहे. याशिवाय आरोग्य भरतीच्या निमित्ताने सुमारे पन्नास जणांना जिल्हा परिषदेत निमंत्रित केल्याचे उघड झाले आहे. (Corona Rule Not Follow by Jiha Parishad)

यानिमित्ताने कोरोना प्रतिबंधासाठीचे नियम जिल्हा प्रशासनाचा एक भाग असलेल्या जिल्हा परिषद पायदळी तुडवायचे का, असा सवाल जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हाभरातून आलेल्या शिक्षक आणि नागरिकांनी सोमवारी सकाळशी बोलताना उपस्थित केला आहे. शिवाय जिल्हा परिषद मुख्यालयात झालेल्या कोरोना नियमांच्या पायमल्लीला जबाबदार कोण, असा प्रश्‍नही ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे आणि भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

पुणे जिल्हा परिषद
५१ लाखांचे अवैध चलन बाळगणाऱ्या प्रवाशाला दिल्लीत अटक

कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी राज्य सरकारने आठवडाभरापूर्वीच नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार लग्नांसह सर्व सार्वजनिक कार्यक्रम, अंत्यविधीसाठीची उपस्थिती आणि सरकारी व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा आणलेल्या आहेत. यानुसार जाहीर समारंभासाठी कमाल ५०, मयतीसाठी २० आणि कार्यालयांतील उपस्थिती एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत निम्म्यावर आणलेली आहे.

जिल्हा परिषद प्रशासन हा सरकारी यंत्रणेचाच एक भाग आहे. त्यामुळे राज्य सरकारने केलेल्या कोणत्याही नियमांचे तंतोतंत पालन करणे ही सर्व सरकारी कार्यालयांची पहिली जबाबदारी आहे. जिल्हा परिषद तर, थेट जिल्हा प्रशासनाशी निगडित आहे. तरीही अशा जबाबदार संस्थेने आणि या संस्थेत काम करत असलेल्या जबाबदार अधिकाऱ्याने कोरोना नियमांची पायमल्ली करणे, हे चुकीचे असल्याचे जगदाळे आणि बुट्टे पाटील यांनी सांगितले.

पुणे जिल्हा परिषद
वडगाव पूल ते नवले पूल जोडणार; NHI चा पालिकेकडे आराखडा

शिक्षक संघटनांनीच गर्दी केली - आयुष प्रसाद

महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या शिक्षकांना याबाबत सामाजिक न्याय मिळावा, या उद्देशाने याबाबत त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या उद्देशाने पुणे जिल्ह्यातील १७ शिक्षक संघटनांच्या प्रत्येकी दोन, याप्रमाणे केवळ ३४ जणांना चर्चेसाठी बोलाविले होते. परंतु शिक्षक संघटनांनी मोठ्या संख्येने शिक्षकांना सोबत आणल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही गर्दी कमी करण्यासाठी पूर्वनियोजित बैठक रद्द केल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com