पुण्या- मुंबईतील "रेड झोन'वाले मोकाट...गावकरी भोगतायेत अशी फळे
वेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्यात कोरोना दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पुणे व मुंबई शहरातील "रेड झोन'मधून तालुक्यात येणारे नागरिक त्यामागचे मुख्य कारण आहे. शहरी भागातून छुप्या मार्गाने तालुक्यात येणाऱ्यांची संख्या तालुक्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. तसेच, शहरातून नियमित प्रवास करणारे शासकीय कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व व्यवसायिकांमुळे तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसत आहे.
णे जिल्ह्यातील सर्वांत दुर्गम म्हणून वेल्हे तालुक्याची ओळख आहे. तसेच, जिल्ह्यातील इतर ठिकाणांच्या तुलनेत वेल्हे तालुक्यातील लोकसंख्येची घनता कितीतरी कमी आहे. मात्र, दाट लोकवस्तीत प्रभावशाली ठरणाऱ्या कोरोनाची वेल्हे तालुक्यात आतापर्यंत 12 जणांना लागण झाली असून, त्यातील आठ जणांनी कोरोनावर मात केली असून, एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तीन कोरोनाबाधितांवर पुणे येथे उपचार चालू आहेत. तसेच, वडगाव झांजे परिसरातील अद्यापही काही जणांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहेत.
वेल्हे तालुक्यात 21 मार्चला पहिला कोरोनाचा रुग्ण पानशेत परिसरात एका अंगणवाडी सेविकेच्या रूपाने सापडला. ही अंगणवाडीसेविका पुणे (वडगाव धायरी) येथे राहत होती. तिचा दररोजचा प्रवास पानशेत परिसरात होता. त्यानंतर 13 एप्रिलला पानशेत परिसरातील एका गावात कोरोनासदृश्य आजाराने एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासनाने या मृत व्यक्तीच्या घरातील लोकांना तपासणीसाठी पाठवले. त्यावेळी मृत व्यक्तीच्या पत्नीला व त्याच्या मेव्हण्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे समजले. मृत्यू झालेली व्यक्ती एका खासगी कंपनीत कामाला होती. संबंधित कंपनी अत्यावश्यक सेवेत येत आहे. त्यामुळे या कंपनीचे कामकाज सुरू होते. या मृत व्यक्तीच्या संपर्कामुळे या परिसरात एकूण 7 जणांना कोरोना बाधा झाली होती. तसेच, या कंपनीतील कर्मचाऱ्यांचा संपर्क पुणे शहराशी आला होता.
तसेच, वेल्हे ग्रामीण रुग्णालयातील एका शिपायाला 25 एप्रिल रोजी कोरोनाची बाधा झाली. तो पुणे शहरातील "रेड झोन' असलेल्या भागातून वेल्हे येथे येत होता. त्यानंतर 9 मे रोजी वडगाव झांजे परिसरात राहणाऱ्या एका 38 वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाली आहे. या युवकाचा पुणे शहराशी संपर्क झाला होता. एकंदर वेल्हे तालुक्यात नियमित प्रवास करणारे कर्मचारी व नागरिक यांच्यामुळे कोरोनाचे संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुविधांच्या अभावामुळे फैलाव
वेल्हे तालुक्यात तालुक्यात मूलभूत सोईचा अभाव आहे. तालुक्यातील नागरिक वैद्यकीय सेवेसाठी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात न जाता खासगी ठिकाणी जातात. त्यामुळे नागरिक एकमेकांच्या संपर्कात येत आहेत. तालुक्यात असलेली आरोग्य सेवा कमकुवत ठरत आहे. या सेवेवर ताण येत आहे. तसेच, तालुक्यातील अनेक गावांत जीवनावश्यक वस्तू मिळत नाहीत. त्यामुळे नागरिक इतर गावांतून किंवा पुणे शहरातून ते आणण्यासाठी जात आहेत. त्यातून अनेक गावांतील नागरिक एकमेकांच्या संपर्कात येत आहेत. तसेच, रात्री तीन वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत छुप्या मार्गाने आजही नागरिक कुटुंबासह गावागावात येत आहेत. शहरातील रेड झोन असलेल्या ठिकाणांहून नागरिक येत आहेत.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सोशल डिस्टन्सला हरताळ गावागावात सोशल डिस्टन्स पाळला जात नाही. पारावर गप्पांचे फड बसत आहेत. अनेक ठिकाणी पत्त्यांचे डाव रंगत आहे. तसेच, युवक पोहण्यासाठी व क्रिकेट खेळण्यासाठी एकत्र येत आहेत. गावातील राजकीय मंडळी आपापल्या हितसंबंधातील व्यक्तींना गावांमध्ये प्रवेश देत आहेत. तसेच, लॉकडाउनच्या अगोदर शहरातून नागरिक गावात आलेले असले, तरी ते गावात सगळीकडे फिरत आहेत. काही शासकीय कर्मचारी अजूनही दररोज पुणे शहरातून ये- जा करत आहेत. तालुक्यातून अजूनही दुग्ध व्यावसायिक नियमित पुणे शहरात जात आहेत. या वाहनांमधून देखील नागरिक प्रवास करीत आहेत. ते धोक्याचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.