पुणे : पुरंदरमधील वीर येथे कोरोना संशयित रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ९ जनांना सासवड येथील कोवीड सेंटरमध्ये हलवण्यात आले असून, पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांच्या पत्नीला पुण्यातील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

परिंचे : पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर येथे कोरोना संशयित रुग्ण आढळला असून, संशयित रुग्णासह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आकरा जनांना जेजुरी येथील कोवीड सेंटरमध्ये हलवण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश पवार यांनी सांगितले. खाजगी लॅबच्या अहवालानुसार रुग्णांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे डॉ.पवार यांनी सांगितले आहे.

 आदित्य ठाकरे यांची पुण्याच्या आमदाराबरोबर ट्विटरवर जुंपली

संशयित रुग्ण मुंबई पोलिस दलात शिपाई असून, सांताक्रूझ येथील कलीना कॉलनीमधील रहिवासी आहे. एक महिन्यांपूर्वी ते वीर येथे सुट्टीसाठी आले होते. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर त्यांना तातडीने मुंबई येथे बंदोबस्तासाठी बोलवण्यात आले. कलीनी कॉलनीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने वीर येथील रुग्ण भितीने खाजगी वाहनातून शनिवारी (ता. १६) तारखेला वीर येथे आले.

सोमवार (ता. १८) रोजी रुग्ण स्वत:हून मनातील शंका काढण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेले होते. त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे न दिसल्याने डॉक्टरांनी सांगितले. तरीदेखील मंगळवारी (ता. १९) रोजी रुग्ण व त्यांच्या पत्नीने खाजगी लॅबमध्ये तपासणी केली असता खाजगी लॅबच्या लेखी अहवालानुसार रुग्ण पॉझिटिव्ह आला असून कोरोनाबाधीत कक्षाकडून त्यास दुजोरा दिला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश पवार म्हणाले.

कोथरुड-कर्वेनगरकर, आता स्वत:ला, कुटुंबाला जपणार अन् कोरोनाला हरविणार

या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ९ जनांना सासवड येथील कोवीड सेंटरमध्ये हलवण्यात आले असून, पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांच्या पत्नीला पुण्यातील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. उद्या त्यांचा स्वॅब तपासणी  सरकारी रुग्णालयात पाठविण्यात येणार आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona suspected patient at Veer in Purandar