पुणे जिल्ह्यात तीन हजारांच्या आत कोरोना चाचण्या 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 31 हजार 418 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 3 लाख 14 हजार 72 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 8 हजार 170 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांची संख्या रविवारी (ता. 15) तीन हजारांच्या आत आली आहे. दिवसभरात एकूण 2 हजार 898 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. दिवसभरात जिल्ह्यात केवळ 329 नवे रुग्ण सापडले आहेत. यात शहरातील 153 जण आहेत. 

वाचा : पैशांसाठी टॉर्चर केल्याने कामगाराची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या 

गेल्या 24 तासांत 353 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड आणि कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. शहरातील चार, नगरपालिका क्षेत्रातील दोन आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

 वाचा : कोयते उगारून शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांना अटक

जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयांत 4 हजार 3 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय 5 हजार 337 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 31 हजार 418 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 3 लाख 14 हजार 72 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 8 हजार 170 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 379 रुग्ण आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona tests within three thousand in Pune district