esakal | Corona Update : पुण्यात काल दिवसभरात 1835 रुग्ण कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus update

Corona Update : पुण्यात काल दिवसभरात 1835 रुग्ण कोरोनामुक्त

sakal_logo
By
शरयू काकडे

पुणे : पुणे जिल्ह्यातील गुरुवारी (ता .10) नव्या कोरोना रुग्ण संख्या 1295 इतकी होती. दरम्यान, पुणे शहरात - 261 पिंपरी चिंचवड - 244, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र - 631, नगरपालिका क्षेत्र - 152, कॅंटोन्मेंट बोर्ड - 07 इतके रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासात एकूण 1835 रुग्ण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, दिवसभरात जिल्ह्यात एकूण 31 जणांचा मृत्यू झाला आहे. (Corona Update 1835 patients cured from corona in Pune yesterday)

पुणे महापालिका हद्दीत नव्याने 10 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 447 इतकी झाली आहे. शहरात उपचार घेणाऱ्या 3 हजार 457 रुग्णांपैकी 535 रुग्ण गंभीर तर 983 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.पुणे शहरात आज एकाच दिवसात 5 हजार 753 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 25 लाख 31 हजार 336 इतकी झाली आहे.पुणे शहरात आज नव्याने 261 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 73 हजार 300 इतकी झाली आहे. शहरातील 333 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या4 लाख 61 हजार 396 झाली आहे.

हेही वाचा: पुण्यात ग्रामीण भागात निर्बंध शिथिल होणार? निर्णयाची शक्यता

पुणे कोरोना अपडेट : गुरूवार 10 जून 2021

उपचार सुरु : 3475

नवे रुग्ण : 261 (473300)

डिस्चार्ज : 333 (461396)

चाचण्या : 5753(2561336)

मृत्यू : 10 (8447)

हेही वाचा: पोलिसांचे काम असे तर, बाकीच्यांचे काय ? अजित पवारांनी ठेकेदाराला झापले