esakal | पुण्यात ग्रामीण भागात निर्बंध शिथिल होणार? निर्णयाची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown

पुण्यात ग्रामीण भागात निर्बंध शिथिल होणार? निर्णयाची शक्यता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागात या आठवड्यातील रुग्ण दर (पॉझिटीव्हिटी रेट) दहा टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. त्यामुळे लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्याबाबत पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. ११) आयोजित बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोरोना पॉझिटीव्हिटी रेट हा पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे दुकाने, हॉटेल, सलून ब्यूटी पार्लर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, पुणे ग्रामीणमधील पॉझिटीव्हिटी रेट हा १२ टक्क्यांच्या आसपास होता. राज्य सरकारने ‘अनलॉक’बाबत निश्चित केलेल्या गटानुसार पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग चौथ्या गटात होता. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या अत्यावश्यक सुविधा वगळता अन्य व्यवहार बंद आहेत.

हेही वाचा: पुणे : महात्मा फुले मंडईत आग


ग्रामीण भागात ऑक्सिजनयुक्त एकूण बेडची संख्या पाच हजार ५२९ इतकी आहे. त्यापैकी मागील आठवड्यात सुमारे एक हजार सातशे रुग्णांवर उपचार सुरू होते. तसेच, या आठवड्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात पॉझिटीव्हिटी रेट हा ९.८७ टक्के इतका आहे. त्यामुळे ग्रामीण भाग हा तिसऱ्या गटात आला आहे. याबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर ‘अनलॉक’बाबत नियमावली लागू करण्यात येईल. त्यानुसार इतर दुकाने आणि हॉटेल सुरू ठेवण्याबाबत काही अटींवर परवानगी मिळण्याची शक्यता आहे.


''जिल्ह्यातील ग्रामीण भागात या आठवड्यातील पॉझिटीव्हिटी रेट दहा टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. त्यामुळे या भागातील परिस्थितीनुसार निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.''
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

हेही वाचा: पोलिसांचे काम असे तर, बाकीच्यांचे काय ? अजित पवारांनी ठेकेदाराला झापले