esakal | Corona Updates: पुणे शहरात उरले 5 हजार सक्रिय रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_Fighters

बुधवारच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 338 जण आहेत. दिवसभरात 9 हजार 899 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

Corona Updates: पुणे शहरात उरले 5 हजार सक्रिय रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोना वेगाने नियंत्रणात येत असल्याचे बुधवारच्या (ता.9) आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. शहरातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजारांपर्यंत खाली आली आहे. यापैकी केवळ 202 रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील रुग्णसंख्या पुन्हा दहा हजारांपर्यंत खाली आली आहे. जिल्ह्यात बुधवारी 782 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

ट्रम्प आणि एलियन्सची युती? इस्त्राईलच्या माजी अंतराळ प्रमुखांचा धक्कादायक दावा​

दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या दहा हजारांपर्यंत खाली आली होती. परंतु दिवाळीनंतर पुन्हा त्यात वाढ होऊन, ही संख्या साडेअकरा हजारांवर पोचली होती. आज ती पुन्हा दहा हजारांपर्यंत खाली आली आहे. जिल्ह्यात सध्या 3 हजार 645 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तसेच 6 हजार 494 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. याशिवाय 1 हजार 28 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाकडून निर्णय झाला, न्याय नाही : पासलकर​

बुधवारच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 338 जण आहेत. दिवसभरात 9 हजार 899 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तसेच गेल्या 24 तासांत 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच चिंचवडमध्ये 167, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 186, नगरपालिका कार्यक्षेत्रात 74 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 17 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहर, िंपंपरी चिंचवड आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी चार जणांचा समावेश आहे. नगरपालिका आणि कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही.

म्हाडाच्या 5647 सदनिकांसाठी अर्ज नोंदणी उद्यापासून; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

आतापर्यंत 8 हजार 537 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 415 रुग्ण आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही मंगळवारी (ता.8) रात्री आठ वाजल्यापासून बुधवारी (ता.9) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.

दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील 317 जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील 281, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 309, नगरपालिका कार्यक्षेत्रातील 42 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील 79 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image