साडेआठ महिन्यानंतर पहिल्यांदा रुग्णांचा साडेसहा हजारांचा आकडा पार | Corona Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona patients

साडेआठ महिन्यानंतर पहिल्यांदा रुग्णांचा साडेसहा हजारांचा आकडा पार

पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune) दिवसातील नवीन कोरोना रुग्णांचा (Corona Patient) साडेसहा हजारांचा आकडा साडेआठ महिन्यानंतर रविवारी (या.९) पहिल्यांदा फार झाला आहे. जिल्ह्यात रविवारी दिवसभरात तब्बल ६ हजार ४६४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याआधी २६ एप्रिल २०२१ रोजी एका दिवसात ६ हजार ४६ नवे रुग्ण आढळून आले होते. (Pune district Corona Patient Updates)

जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील ४ हजार २९ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये १ हजार ५३५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ५९१, नगरपालिका ‌हद्दीत २६१ आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १४८ श नवे रुग्ण आढळून आले आहेत. अन्य दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहर आणि नगरपालिका हद्दीतील प्रत्येकी एका मृत्यूचा समावेश आहे.

हेही वाचा: अखेर लसीकरण प्रमाणपत्रावरुन हटवला जाणार PM मोदींचा फोटो

याउलट जिल्ह्यात दिवसभरात ८३४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ६८८ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ५२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६९, नगरपालिका हद्दीतील ९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण चोवीस हजार 485 सक्रिय रुग्ण आहेत.दिवसातील एकूण कोणा रुग्णांपैकी पुणे शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये १ हजार ३१० जण उपचार घेत आहेत. उर्वरित २३ हजार १७५ गृहविलगीकरणात आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top